मुखेड (प्रतिनिधी)- फेसबुक पोस्टवर केलेल्या कॉमेंटचा राग मनात धरून दोन जणांनी एका ३८ वर्षीय व्यक्तीस मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना २ एप्रिल रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुखेड बसस्थानक येथे घडली. याबाबत बंडे गल्ली, मुखेड येथील रहिवासी बबनसिंग विठ्ठलसिंग ठाकूर (वय ३८) यांनी मुखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, बब्बू उर्फ बबलू मौलाना शेख (वय ३३) व त्याचा साथीदार फिरोज, रा. बालाजी गल्ली, क्लोज फुलेनगर, मुखेड यांनी ठाकूर यांना मुखेड बसस्थानक परिसरात गाठले. “तू फेसबुकवर कॉमेंट का केली?” असा जाब विचारत आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या जवळील ५,२०० रुपये रोख रक्कम बळजबरीने हिसकावून घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.या प्रकरणी मुखेड पोलिसांनी गुन्हा क्रमांक ७२/२०२० अन्वये गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख पुढील तपास करीत आहेत.या प्रकरणातील एकाला मुखेड पोलिसांनी अटक केली आहे. Kanthak Suryatal Post Views: 730 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मुलाकडून वडिलांचा फरशीने खून;दुसऱ्या कडून जेवण मागणे वडिलांना महाग पडले टिपर गोदावरी नदीत कोसळून सहायकाचा मृत्यू चालक बचावला