पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक पंकज इंगळे,पोलीस अंमलदार प्रदीप खानसोळे,संजीव जिंकलवाड,गणेश धुमाळ,कामाजी गवळी यांनी इतवारा पोलीस ठाणे हद्दीत गुटख्याचा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार 31 मार्च रोजी इस्लामपुरा परिसरातील एका पत्र्याच्या शेडवर छापा टाकण्यात आला.
या कारवाईत सुमारे 5,03,740 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी मोहम्मद शोएब मोहम्मद अकबर (देगलूर नाका), शेख अमीर (हिमायतनगर), शेख अजिम परभणीवाला (परभणी) आणि बबलू शेख अजिमोद्दीन (मुदखेड) यांच्याविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात आरोपी हे संघटित पद्धतीने गुटखा व्यवसाय करत असल्याचे उघड झाले आहे. ते शेजारील राज्यांतून मोठ्या प्रमाणात गुटखा आणून नांदेड व परभणी जिल्ह्यातील किरकोळ विक्रेत्यांना पुरवठा करत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास इतवारा पोलीस करीत असून, या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचा शोध सुरू आहे.डॉक्टरची सुद्धा शस्त्रक्रिया तपासणी होणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.
