नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी दोन युवकांना पकडून त्यांच्याकडून एक लोखंडी गावठी पिस्टल आणि 11 जीवंत काडतूसे जप्त केली आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी पाठविलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार 13 एप्रिल रोजी ईदगाह मैदानात त्यांनी छापा टाकला आणि त्या ठिकाणी त्यांनी शेख ईलियास शेख इरफान (23) आणि शेख शहबाज शेख शकील (24) या दोघांना पकडले. यांची अंगझडती घेतली असता शेख ईलियास शेख इरफानकडे एक गावठी पिस्टल आणि चार जीवंत काडतुसे किंमत 32 हजार रुपये आणि शेख शहबाज शेख शकील याच्याकडून 7 जीवंत काडतूसे किंमत 3 हजार 500 रुपये असा एकूण 35 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याविरुध्द भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा क्रमांक 191/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन गढवे यांच्याकडे देण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, इतवारा विभागाचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांनी नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक नागनाथ आयलाने, सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन गढवे, पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे, पोलीस अंमलदार संतोष जाधव, विक्रम वाकोडे, मारोती माने, शेख सत्तार, मारोती पचलिंग, माधव माने, चंद्रकांत स्वामी, शिवानंद तेजबंद, शंकर माळगे, मंगेश पालेपवाड, विठ्ठल भिसे यांचे कौतुक केले आहे.