नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील प्रभाग क्र. 19 मधील साईरामनगर कौठा हा भाग येतो. या भागात प्रसिद्ध श्री साई मंदिर आहे. गेल्या 20 वर्षांपासून या भागात नागरी वस्ती आहे. मनपा हद्दीत असूनही एखाद्या खेड्यासारखी अवस्था या भागाची आहे. कारण अजून पावेतो या भागात ड्रेनेजसारखी महत्त्वाची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे अंतर्गत रस्त्याची कामेही होऊ शकत नाहीत असे सांगण्यात आले. काही भागात नळ सुविधा आहे तर दोन दोन महिने पाणी येत नाही, रस्ते आणि पथदिवे याबाबतही अशीच स्थिती आहे. ड्रेनेज लाईन लवकरात लवकर टाकावी, पाणी पुरवठा नियमित करावा. पथदिवे आणि अन्य नागरी सुविधा द्याव्यात. या भागातील बहुतांश जण नियमित कर भरणारे असूनही त्यांनाच नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे तातडीने या नागरी सुविधा पुरवाव्यात आणि नियमित कर भरणाऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करणारे निवेदन साईरामनगर विकास समितीने मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांना दिले आहे. माजी नगरसेवक राजू गोरे, साईरामनगर विकास समितीचे प्रेमकुमार फेरवाणी,अनिल व्यास,महेश व्यास, भगवती प्रसाद व्यास, आशिष धूत, राहुल पांडेय, खेमका दायमा,विशाल शर्मा, कृष्णा उमरीकर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. निवेदनावर उपरोक्त समिती सदस्यांसह नितेश चंदनानी, प्रमोद बाहेती,जी.एम.दायमा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
More Related Articles
पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयासमोर जबरी चोरी
नांदेड(प्रतिनिधी)-25 ते 30 वयोगटातील चार जणांनी तीन जणांना मारहाण करून एक गाडी बळजबरी चोरून नेली…
पहिल्या दिवशी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांचे उत्साहात मतदान ;२१ एप्रिलपर्यंत चालणार प्रक्रिया
नांदेड : -लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने यावेळी 85 वयोमर्यादा पेक्षा अधिक वय असणारे मतदार व…
मराठा आंदोलनात सक्रिय सहभाग घेणाऱ्या माधव जवळगावकरांना ओबीसी बांधवांनी धडा शिकवावा
एका ओबीसी मतदाराने वास्तव न्युज लाईव्हला पाठविलेला हा संदेश आम्ही जशाचा तसा वाचकांसाठी प्रसिध्द करत…
