या प्रकरणी फिर्यादी रवि संगय्याप्पा मठपती (वय २२, व्यवसाय पुजारी, रा. माळेगाव मक्ता, ता. देगलूर, जि. नांदेड) यांनी मरखेल पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, ६ मार्च रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ते ७ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजेपर्यंत अज्ञात व्यक्तीने मंदिरातील दानपेटी फोडून सुमारे ७ हजार रुपये चोरून नेले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मरखेल पोलिसांनी गुन्हा क्रमांक ४२/२०२६, भा.दं.वि. कलम ३३४(१) व ३०५ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार राजू पी. किशन शिवरे (वय ३०, व्यवसाय शेतमजुरी, रा. कतलवाडी मंडळ जुक्कल, जि. कामारेड्डी, राज्य तेलंगणा) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने मंदिरातील दानपेटी फोडून चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीकडून ५०० रुपयांच्या २ नोटा, २०० रुपयांच्या ६ नोटा, १०० रुपयांच्या २५ नोटा, ५० रुपयांच्या ६ नोटा, २० रुपयांच्या ४० नोटा, १० रुपयांच्या ६० नोटा व ५ रुपयांची ६० नाणी असा एकूण ६७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक रवि हुंडेकर,पोलीस अंमलदार राजू मारोती दोसलवार आणि संभाजी बालाजी पाटील यांनी सहभाग घेतला.
