नांदेड(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी कॉंगे्रस पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा आणि जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद सध्या रिक्त आहे. या पदावर नवीन नियुक्ती करण्याासाठी पक्ष निरिक्षक म्हणून शेख माने आणि जिल्हा निरिक्षक आशा भिसे यांनी आढावा घेतला.
राष्ट्रवादी कॉंगे्रस शरद पवार गटाची संघटनात्मक बैठक आज शासकीय विश्रामगृहात पार पडली. या बैठकीला राज्य निरिक्षक व समन्वयक म्हणून शेखर माने, जिल्हा निरिक्षक म्हणून आशा भिसे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी माजी आ.प्रदीप नाईक, शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनिल कदम, महिला जिल्हाध्यक्षा प्रांजली रावणगावकर, बी.जी.जांभरूनकर, कल्पना डोंगळीकर, धनंजय सुर्यवंशी आदींची उपस्थिती होती.
यावेळी माने यांनी पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, आज विधानसभा निहाय कार्यकर्त्यांची बैठक घेवून त्यांच्यासोबत चर्चा केली. यात जिल्ह्यातील संघटनेतील रिक्त पदांवर लवकरच नियुक्त्या केल्या जाणार आहेत. यासाठी जिल्हाध्यक्ष पदासाठी अनेकांची नावे आली आहेत. विशेषता: यात महिलांचीही नावे आहेत असे सांगितले.
याचबरोबर आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत. महाविकास आघाडीतील कोणीही उमेदवार असो त्याचे काम आम्ही करणार आहोत. उमेदवार कोण हे महत्वाच नाही आम्हाला भाजपला हरवायचे आहे हा आमचा अजेंडा आहे असे त्यांनी सांगितले.