नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाच्या सांस्कृतीक कार्य विभागाकडून व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवन कार्यावर आधारीत 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवगर्जना महानाट्याचे आयोजन नांदेड शहरात गुरूद्वारा मैदान हिंगोली गेट येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या महानाट्य कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. तसेच प्रमुख पााहुणे म्हणून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, खा.प्रताप पाटील चिखलीकर, खा.सुधाकर श्रृंगारे, आ.सतिश चव्हाण, आ.विक्रम काळे, आ.राम पाटील रातोळीकर, आ.भिमराव केराम, आ.माधव जवळगावकर, आ.डॉ.तुषार राठोड, आ.शामसुंदर शिंदे, आ.राजेश पवार, आ.जितेश अंतापूरकर, आ.बालाजी कल्याणकर तर विशेष निमंत्रीत म्हणून स्वा.रा.ती.म.विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मनोहर चासकर, विशेष पोलीस महानिरिक्षक शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, विभागीय रेल्वे प्रबंधक निती सरकार, मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर हे राहणार आहेत.
यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत बोलत असतांना म्हणाले की, राज्य शासनाच्या सांस्कृतीक विभागाच्यावतीने व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवन कार्यालयावर व शिवकालीन स्मृती जगविण्यासाठी हा महानाट्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे महानाट्य दि.9, 10, 11 मार्च या कालावधीत सायंकाळी 6.30 वाजता शहरातील गुरूद्वारा मैदान हिंगोली गेट रेल्वे स्थानक परिसरात आयोजित करण्यात आले आहे. यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून याचबरोबर ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्य परिवाहन महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यात हा महानाट्य आयोजित करण्यात आाले होते. आता नांदेड येथे हा महानाट्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.