नांदेड(प्रतिनिधी)-धर्माबाद तालुक्यातील मौजे पाटोदा(बु) येथे अहिल्याबाई सिंचन विहिर योजनेच्या विहारीचा प्रस्ताव मंजुर करण्यासाठी महिला कंत्राटी तांत्रिक सहाय्यकाने 8 हजार रुपयांची लाच मागितली. आणि तडजोडीनंतर नवऱ्याकडे 6 हजार रुपये देण्यास सांगितल्यानंतर लाचेचे पैसे स्विकारताच पती-पत्नीला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले आहे.
मौजे पाटोदा येथील एका तक्रारदाराने 4 मार्च रोजी दिलेल्या तक्रारीनुसार मौजे पाटोदा येथील शेत गट क्रमांक 444 मध्ये त्यांची एक एकर शेती आहे. त्या शेतीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून अहिल्याबाई सिंचन विहिर योजना मिळविण्यासाठी त्यांनी अर्ज सादर केला होता. धर्माबाद पंचायत समिती येथील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांनी या प्रस्तावावर टिपणी तयार करून तांत्रिक सहाय्यक श्रीमती प्रियंका किशनराव लोहगावकर (29) यांच्याकडे चौकशी करण्यासाठी दिला. चौकशी दरम्यान प्रियंका लोहगावकर यांनी तक्रारदाराकडून 8 हजार रुपये लाचेची मागणी केली. ही रक्कम लाच असल्याची खात्री झाल्यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार दिली.
आज 7 मार्च रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार शासकीय पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणी करण्यासाठी धर्माबाद येथे गेले. तेथे पंचासमक्ष प्रियंका लोहगावकर यांनी 8 हजाराच्या लाच मागणीत 2 हजारांची सुट देवून 6 हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले. लाचेचे 6 हजार रुपये पती मकरंद गंगाधर काळेवार यांच्याकडे देण्यास सांगितले. लाचेची रक्कम स्विकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी प्रियंका किशनराव लोहगावकर(29) आणि तिचाा नवरा मकरंद गंगाधर काळेवार या दोघांना जेरबंद केले. वृत्तलिहिपर्यंत याबाबत धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक डॉ.राजकुमार शिंदे, पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक कालीदास ढवळे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गजेंद्र मांजरमकर, पोलीस अंमलदार शेख रसुल, मेनका पवार, मारोती सोनटक्के यांनी ही कार्यवाही पुर्ण केली. या गुन्ह्यााचा तपास पोलीस निरिक्षक कालीदास ढवळे हे करणार आहेत.
लाचेची माहिती देतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नांदेड जिल्ह्यातील जनतेला आवाहन केले आहे की, कोणतेही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने कोणी खाजगी व्यक्ती आदींनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यक्तीरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास जनतेने तात्काळ दुरध्वनी क्रमांक 02462-253512 आणि टो फ्री क्रमांक 1064 वर माहिती देवून लाचखोरांवर आळा घाळण्यासाठी पुढकार घ्यावा.
काही दिवसांपुर्वीच याच कंत्राटी सहाय्यक तांत्रिक महिलेने एका पत्रकाराविरुध्द तक्रार दिली होती. या तक्रारीत महिलेने बरेच घाणेरडे आरोप केले होते. त्या तक्रारीवरुन धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा पण दाखल झाला होता. काही दिवसानंतरच महिला आणि महिलेचा पती दोघांना लाच घेतांना अटक झाली आहे. मग आता कोणला खरे मानावे हा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे. कारण पत्रकाराविरुध्द तक्रार देतांना त्या लिहिलेले आरोप आणि आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात अडकलेले आरोप एकच आहेत. यावरुन असे लिहिता येईल की आपल्या कर्माची फळे येथेच भोगण्याची सोय योगेश्र्वराने केली आहे. कारण अशा फालतू पापावर वेळ देण्यासाठी योगेश्र्वराकडे वेळ नाही. म्हणूनच म्हणतात जसे पेराल तसेच उगवेल.