पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या पथकाची जबरदस्त कामगिरी

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या पथकाने तीन आरोपींना पकडून विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या तीन, भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन आणि हदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक अशा पाच चोरींच्या गुन्ह्याची उकल केली असून 2 लाख 18 हजार 500 रुपयंाचा ऐवज जप्त केला आहे. ज्यामध्ये एक गावठी पिस्टल सुध्दा आहे. या प्रकरणातील अजून पाच आरोपी पकडणे शिल्लक आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक साईनाथ पुयड, पेालीस अंमलदार मिलिंद नरबाग, प्रमोद जोंधळे, शेख इमरान, संदीप घोगरे, बालाजी कदम, अमोल घेवारे, शेख उमर, शेख अजरोद्दीन, महेश बडगु, दिपक ओढणे यांच्या पथकाने आसना टी पॉईंट ते तरोडा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील हळदी व ज्वारीच्या शेताजवळ थांबलेले सय्यद उमर सय्यद फारुख (22) रा.लेबर कॉलनी नांदेड, मोहम्मद एजाज उर्फ बॅनेट मोहम्मद अकबर (35) रा.इस्लामपूरा नांदेड, सय्यद अब्बु तलहा उर्फ तलहा पाटी सय्यद रहिम (26) रा.मगदुमनगर नांदेड या तिघांना पकडले. त्यांनी शस्त्राचा धाक दाखवून केलेल्या जबरी चोऱ्या, दुचाकी चोऱ्या आणि घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यांच्या कबुलीप्रमाणे विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 3, भाग्यनगर 2, हदगाव 1 असे 6 गुन्हे उघडकीस आले आहेत. पेालीसांनी त्यांच्याकडून 2.7 तोळे सोन्याचे दागिणे किंमत 1 लाख 8 हजार रुपये, दोन दुचाकी गाड्या 70 हजार रुपयांच्या, दोन मोबाईल 10 हजार पयांचे एक खंजर आणि गावठी बंदुक 30 हजार 500 रुपयांची असा 2 लाख 18 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!