कंधार पोलीसांनी 8 जुगाऱ्यांना पकडले

नांदेड (प्रतिनिधी)-कंधार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे मंगनाळी शिवारात केरबा ज्ञानोबा शिंदे यांच्या शेतात सुरू असलेला जुगार अड्डा पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनात कंधार पोलीसांनी उघड पाडला.
पोलीस उपनिरिक्षक अप्पा मुरलीधर सानप यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14 फेबु्रवारी रोजी दुपारी 3 वाजेच्यासुमारास त्यांनी पोलीस निरिक्षक चंद्रकांत जाधव यांच्यासह पोलीस उपनिरिक्षक स्नेहा पिंपरखेडे, पोलीस अंमलदार कंधारे, देविदास गिते, सुनिल सातवे, अंकुश पवार गणपत केंद्रे, धोंडीबा नागरगोजे यांच्यासह छापा टाकला. त्या ठिकाणी हनमंत देविदास शिंदे , चंदन बालाजी जोगदंड, सुर्यकांत केरबा शिंदे, विजयकुमार अप्पाराव राजे, ज्ञानोबा केरबा शिंदे, विजयकुमार निवृत्ती शिंदे, विलास भानुदास शिंदे आणि शेषराव प्रल्हाद शिंदे यांना पकडले हे सर्व जुगार खेळत होते. त्यांच्याकडून तीन दुचाकी गाड्या 4 मोबाईल आणि जुगाराचे साहित्य, 17 हजार 585 रुपये रोख रक्कम असा एकूण 2 लाख 27 हजार 585 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!