स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीसाने दिलेल्या तक्रारीनंतर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात 15 तासानंतर गुन्हा दाखल

पोलीसांच्या तक्रारीची ही अवस्था तर सर्वसामान्यांच्या तक्रारीचे काय?
नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीसाने तक्रार दिल्यानंतर ती तक्रार दाखल होण्यासाठी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात 15 तासांचा वेळ लागतो. अशा परिस्थितीत सर्व सामान्य माणसाची तक्रार कधी दाखल होईल हा एक नवीन प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.
दि.2 मार्च रोजी रात्री 10 वाजता स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार मुंडे, तेलंग, कदम, पुलेवार आणि दादाराव श्रीरामे हे शासकीय वाहनाने कोबींग ऑपरेशन करत असतांना काळेश्र्वर मंदिराच्या कमानीजवळ स्थानिक गुन्हा शाखेचे पथक थांबले असतांना काळेश्र्वर मंदिराकडून रेती भरलेले 3 हायवा येतांना त्यांनी पाहिले. या हायवा गाड्यांवर नोंेदणी क्रमांक लिहिलेला नव्हता. तसेच त्यामध्ये वाळू भरलेली होती. वाळूची कागदपत्रे आणि गाडीची कागदपत्रे विचारली असता त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र उपलब्ध नव्हते. तेंव्हा स्थानिक गुन्हा शाखेने या तिन गाड्या जप्त केल्या. या तिन गाड्यांमध्ये दोन हायवा गाड्या आहेत आणि एक टिपर आहे. त्यांचे नोंदणी क्रमांक अनुक्रमे पुढील प्रमाणे आहेत. एम.एच.26 बी.ई.5927 किंमत 15 लाख रुपये आणि त्यात भरलेली वाळू 20 हजार रुपये किंमतीची हा हायवा आनंदा चांदू वाघमारे रा.राहुलनगर वाघाळा याच्या ताब्यातून जप्त केला. दुसरा हायवा क्रमांक एम.एच.26 बी.ई.1707 हायवाची किंमत 15 लाख आणि त्यातील वाळू 20 हजारांची हा हायवा मनोज लक्ष्मण सरोवर रा.गोपाळचावडी याच्या ताब्यातून जप्त करण्यात आला. तिसरा टिपर क्रमांक एम.एच.22 एन.1822 किंमत 10 लाख त्यात भरलेली वाळू 12 हजार रुपये असा एकूण 40 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हा शाखेने जप्त केला. या बाबतचा जप्ती पंचनामा स्थानिक गुन्हा शाखोने 3 मार्चच्या मध्यरात्री 1.25 वाजता तयार केला. तक्रार आणि तीन गाड्या नांदेड ग्रामीण पोलीसांच्या हवाली केल्यानंतर सुध्दा हा गुन्हा 3 मार्च 2024 च्या स्टेशन डायरी नोंद क्रमांक 21 नुसार सायंकाळी 4.28 वाजता दाखल झाला. या गुन्ह्याची तक्रार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अंमलदार रुपशे गंगाधर दासरवाड यांनी दिल्यानंतर सुध्दा हा गुन्हा दाखल करण्यासाठी जवळपास 15 तासांचा वेळ लागला. या प्रकरणात पोलीसांनी आपल्या तक्रारीत कोणी शेख मेहराज मोबाईल नंबर 9823866111 या व्यक्तीने बेकायदेशीर रित्या चोरीची वाळू या हायवामध्ये भरून दिली आहे असेही लिहिले आहे. पोलीसांनी या हायवा गाड्यांचे मालक आणि चाालक आणि शेख मेहराज यांना सुध्दा या प्रकरणात आरोपी केले. 15 तासानंतर का होईना नांदेड ग्रामीण पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 379, 34नुसार गुन्हा क्रमांक 162/2024 दाखल केला असून या गुन्ह्याचा तपास कायद्याने परिपुर्ण असलेले पोलीस निरिक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार शेख सत्तार यांच्याकडे देण्यात आला आहे.
हायवा गाडी क्रमांक 5927 ही कोणी उध्दव नागरवाड यांच्या नावे आहे. या वाहनाचा विमा 22 फेबु्रवारी 2024 रोजीच संपलेला आहे. हायवा क्रमांक 1707 आणि टिपर क्रमांक 1822 या दोन्ही गाड्यांच्या मालकांचे नाव परिवहन विभागाच्या ऍपवर लपवलेले दिसते. हायवा क्रमांक 1707 चा विमा येत्या आठ दिवसात संपणार आहे. गाड्यांचे नोंदणी क्रमांक असतांना नोंदणी क्रमांक गाड्यावर न टाकता याा गाड्या चालवता येतात काय ? हा प्र्रश्न या निमित्ताने समोर आला आहे. रात्री घटनास्थळावर हजर असलेल्या काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षकांसह मोठे पोलीस पथक तेथे हजर असतांना अत्यंत जोरदार आवाजात आमच्या गाड्या पकडता काय? तुम्हाला काय अधिकार आहेत?, कलेक्टर साहेबांना सर्व माहित आहे असे सांगत होते. यावरून दोन नंबरचा वाळूचा धंदा करणाऱ्यांमध्ये सुध्दा एवढी गुर्मी का आली आहे यावर सुध्दा जबरदस्त ताकतीचे इंजेक्शन देण्याची गरज आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!