धर्माबाद शहरात 32 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही;कार्यवाहीत 13 हजार 600 रुपये दंड वसूल

नांदेड- धर्माबाद शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने 5 फेब्रुवारी रोजी धर्माबाद शहरात विविध ठिकाणी अचानक धाडी टाकून  एकूण 32 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही केली. या कार्यवाही  13 हजार 600 रुपये दंड वसूल केला.

ही कार्यवाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पांडुरंग पावडे व नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. शितल चातुरे, डॉ.संजीवनी जाधव, डेंटल सर्जन डॉ. म्याकलवर, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते बालाजी गायकवाड, एमजीवीएसचे मंगेश गायकवाड, समुपदेशक नितीन आडे व दंत सहायक रमेश जक्कावाड तसेच धर्माबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्सटेबल एफ.ए.सय्यद व ए.एस. कदम उपस्थित होते.सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय नांदेड येथे तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या या अभियानास सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!