नांदेड – इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी, विष्णुपुरी, नांदेड येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे महादेव पिंपळगाव येथे दि. २८ जानेवारी २०२६ ते ०३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सात दिवसीय शिबिराचा समारोप कार्यक्रम मंगळवार, दि. ०३ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नवघरे होते. तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. मारुती गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी महादेव पिंपळगावच्या सरपंच वर्षा खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य कपिल दुधमाल तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम समन्वयक आर. के. कदम यांनी सात दिवसांच्या शिबिरात स्वयंसेवकांनी राबवलेल्या विविध उपक्रमांचा सविस्तर लेखाजोखा अहवालाद्वारे सादर केला. या शिबिरामध्ये स्वयंसेवकांनी गावातील मुख्य रस्त्यांची स्वच्छता करून प्लास्टिक संकलन, जलसंधारण, सेंद्रिय शेती व भूमी विकास, वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता, बालविवाह प्रतिबंध, अंधश्रद्धा निर्मूलन, रस्ता सुरक्षा, सायबर सुरक्षा तसेच मतदार जनजागृती असे विविध समाजोपयोगी उपक्रम प्रभावीपणे राबवले. प्रमुख अतिथी डॉ. मारुती गायकवाड यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शाश्वत विकास व जलसंधारणाचे महत्त्व विशद करत स्वयंसेवकांना समाजाभिमुख कार्यासाठी प्रेरित केले. तसेच प्रा. डॉ. सूर्यकांत जाधव यांनी वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. सरपंच वर्षा खंडागळे आणि कपिल दुधमाल यांनी ग्रामस्थांच्या वतीने शिबिराबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. विजय नवघरे यांनी गावकरी व विद्यार्थ्यांनी शिबिर यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले तसेच अशा शिबिरांमधून विद्यार्थ्यांमध्ये शाश्वत जीवनमूल्ये रुजतात, त्यामुळे विद्यार्थ्यांनी अधिकाधिक सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी स्वयंसेवक राम जाधव आणि ओंकार शिंदे यांनी शिबिरातील अनुभव कथन करून आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद रिजवान यांनी केले, तर आभार प्रदर्शन आर. के. कदम यांनी केले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. पल्लवी कांबळे, डॉ. प्रविण कारले, प्रा. मेघा गाजले, महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी, महादेव पिंपळगाव येथील सुजाण नागरिक तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. Kanthak Suryatal Post Views: 556 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation कारागिरांच्या व्यवसायवृध्दीसाठी प्रदर्शन व विक्री उपक्रम महत्वाचे -मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे मानव कल्याणासाठी विश्र्वशांती महायज्ञ-केदार जगद्गुरु