राष्ट्रीय शालेय नेटबॉल स्पर्धेत तिन्ही वयोगटात महाराष्ट्रच्या संघाने सुवर्ण पदक प्राप्त केले अजित दादांना समर्पित 

 

नांदेड  :- मा. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड, महाराष्ट्र नेटबॉल असोसिएशन व नांदेड जिल्हा नेटबॉल असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने सन 2025-26 या वर्षातील राष्ट्रीयस्तर शालेय नेटबॉल (14 वर्षे मुले-मुली व 17 वर्षे मुली) क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि. 27 जानेवारी,2026 ते 01 फेब्रुवारी,2026 या कालावधीत श्री गुरुग्रंथ साहिब भवन मैदान गुरुद्वारा परीसर, नांदेड येथे संपन्न झाले.

या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी मोन्टीसिंग जहागीरदार हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन मा.श्री.जयकुमार टेंभरे (जिल्हा क्रीडा अधिकारी,नांदेड तथा निरिक्षक, एस.जी.एफ.आय), मा.श्री. सतिश इंगळे, अध्यक्ष, महाराष्ट्र नेटबॉल संघटना, श्री. विजय काकडे, तालुका क्रीडा अधिकारी, प्रवीण कुपटीकर, सचिव, नांदेड जिल्हा नेटबॉल असोसिएशन श्रीमती प्रिती (क्षेत्र अधिकारी, एस.जी.एफ.आय.), पत्रकार संधुजी आदी मान्यवर उपस्थित होते.

समारोप कार्यक्रम प्रसंगी सर्वप्रथम मा. कै. अजीत पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे दु:खद निधन झाले असल्याकारणाने महाराष्ट्र राज्याच्या संघाचे सर्वच पदक समर्पीत करुन भावपूर्ण श्रृध्दांजली वाहण्यात आली.

त्यानंतर या राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेत संपुर्ण भारतातून 14 वर्षे मुले- 14 वर्षे-मुली व 17 वर्षे मुली असे एकुण 62 मुलां-मुलींच्या संघानी सहभाग घेतला असून यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या संघाचे वर्चस्व राहीले आहे. स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे आहे.

14 वर्षे मुले- प्रथम- महाराष्ट्र, द्वितीय- मध्यप्रदेश तर तृतीय- विदयाभारती, 14 वर्षे मुली- प्रथम- महाराष्ट्र, द्वितीय- कर्नाटका तर तृतीय- हरियाणा, 17 वर्षे मुली- प्रथम- महाराष्ट्र, द्वितीय- राजस्थान तर तृतीय- गुजरात

सदर महाराष्ट्र राज्याच्या संघाची मा.श्री. महादेव कसगावडे, उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, लातूर विभाग,लातूर व मा. श्री.जयकुमार टेंभरे (जिल्हा क्रीडा अधिकारी,नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करण्यात आली होती याकरीता क्रीडा मार्गदर्शक 14 वर्षे मुले व मुलीसंघाकरीता समिर सिखीलकर व प्रवीण कुपटीकर तर संघव्यवस्थापक म्हणुन श्री.संजय चव्हाण व रुकसाना मुलानी हे आहेत. तर 17 वर्षे मुली संघाकरीता क्रीडा मार्गदर्शक म्हणुन श्री. निखील पोटदुखे हे तर संघ व्यवस्थापक म्हणुन श्री. महेशकुमार काळदाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्याच्या संघात 14 वर्षे मुले- कार्तिक वाघ, निखिल राजपूत, यश पावडे, राज वाघ, साहिल मुलानी, साई गजभारे, अनमोल जाधव, विरोचन शिंदे, अनिरुध्द लंगोटे, आयुष येरणे, धनुष झावरे तर 14 वर्षे मुलीच्या संघात – भावना गावडे, सृष्टी गायकवाड, वेदिका तनपुरे, मोहिनी पडोळे, नंदिनी जगदेवे अनुष्का गायकवाड, गीता कांबळे, ऋतुजा वाघ, समृध्दी पवार, दुव्रा दापले, रोशनी बनसोडे, रक्षिता बकवाड, तसेच 17 वर्षे मुलीच्या संघात अक्षता कोकणे, विशालाक्षी राठी, नेत्रा कांसरा, अनुष्का चामलाटे, पुर्वश्री वाघ, सई इजाते, कविता नाईक, कुशी हलमारे, अश्विनी तांबारे, जिज्ञासा चौहाण, आघाव जान्हवी, ईशा पाटील या खेळाडूंचा समावेश होता.

पंच प्रमुख म्हणुन सतिश इंगळे, अध्यक्ष, महाराष्ट्र नेटबॉल संघटना हे होते तर पंच म्हणुन लक्ष्मण दातीर, श्री.आकाश सरदार, श्री. विलास पराते, स्नेहदीप कोकाटे, हर्षवर्धन मगरे, शुभम मांजी, अभिषेक मुकाती, हैदारअली सय्यद, सचिन दांडगे, निलेश चौधरी, रोमदेव बाळपांडे, नरेश कळंबे, स्तुती पाटोळे, साक्षी पाटील, सुमेध गायकवाड, गणराज हेप्पट, अभिजीत देशमुख, ऋतुराज यादव, यश गायकवाड, प्रथमेश देरंगे आदीनी काम पाहीले. सदर स्पर्धा यशस्वी करणेसाठी मा. जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांचे मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा अधिकारी श्री. विजय काकडे, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्री. चंद्रप्रकाश होनवडजकर, श्रीमती शिवकांता देशमुख, क्रीडा अधिकारी श्री. राहुल श्रीरामवार, विपुल दापके, जिल्हा संघटक गाईड श्रीमती रुपाली मुधोळकर, जिल्हा संघटना सचिव, श्री. प्रवीण कुपटीकर, रवी बकवाड, कनिष्ठ लिपीक दत्तकुमार धुतडे, कु. रोहीणी घंटेवाड, वैभव दोमकोंडवार, हनमंत नरवाडे, कृष्णा परिवाले, मोहन पवार, शेख इकरम, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, यश कांबळे व नेटबॉल असोसिएशनचे पदाधिकारी व खेळाडू आदिनी सहकार्य केले असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!