भुमिहीन दारिद्ररेषेखालील आदिवासीचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेत इच्छुक शेतमालकांनी शेत विक्रीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड – जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम अंतर्गत भुमिहीन दारिद्ररेषेखालील आदिवासीचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत 4 एकर जिरायती (कोरडवाहु) किंवा २ एकर बागायती (ओलीताखालील) जमिन उपलब्ध करुन देणे ही योजना राबवायची आहे.
                 तेव्हा नांदेड जिल्ह्यातील (प्राधान्याने किनवट व माहूर तालुका) येथील इच्छूक शेतमालकांनी आपला  शेत विक्रीसाठी आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्र. भुवायो-2018/प्र.क्र.127/का-14 दि. 28 जुलै 2021 मधील परिच्छेद क्र. 02 व परिशिष्ठ-ब नुसार शेती विकणेसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट जि. नांदेड येथे माहिती सुविधा केंद्रामध्ये परिपूर्ण अर्ज, आवेदन पत्र भरणा करावे तसेच आपले अर्ज, आवेदन सुट्टीचे दिवस वगळता कार्यालयीन वेळेत सादर करण्यात यावेत असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जेनितचंद्रा दोन्तुला यांनी केले आहे.
इच्छूक शेत मालकांना शेत विक्रीसाठी अर्ज, आवेदन करण्यासाठी असून, या योजनेअंतर्गत शेत मिळविण्यासाठी लाभार्थ्यांसाठी अर्ज, आवेदन नाही याची नोंद घ्यावी असेही प्रसिध्दीप्रत्रकात कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!