नांदेड(प्रतिनिधी)-मौजे होंडाळा ता.मुखेड येथे एक घरफोडून चोरट्यांनी 40 हजारांचा ऐवज चोरला आहे. तसेच मौजे सवना ता.हिमायतनगर एका शेतातून सोलार कंट्रोल बॉक्स आणि केबल वायर असा 65 हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे.
प्रकाश गणेश सोनटक्के यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 जानेवारीच्या रात्री 9.30 ते 28 जानेवारीच्या पहाटे 5.30 वाजेदरम्यान मौजे होंडाळा ता.मुखेड येथील त्यांच्या घराचे कुलूप तोडून कोणी तरी चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि कपाटातील 40 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरून नेले आहेत. मुखेड पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 23/2026 दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक माने अधिक तपास करीत आहेत.
ओमकार पोशेट्टी अनगुलवार यांनी दिलेल्यातक्रारीनुसार मौजे सवना ता.हिमायतनगर येथील त्यांच्या शेत शिवारातून 27 जानेवारीच्या सायंकाळी 6 ते 28 जानेवारीच्या पहाटे 6 वाजेदरम्यान आखाड्यावर असलेले सोलार कंट्रोल बॉक्स 18 हजार रुपये किंमतीचे आणि त्यांच्या शेजारी असलेल्या शेतकऱ्याच्या शेतातील पाण्याच्या मोटारीचे केबल 47 हजार रुपयंाचे असा एकूण 65 हजारांचा ऐवज कोणी तरी चोरुन नेला आहे. हिमायतनगर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 8/2026 दाखल केला असून पोलीस अंमलदार गेडाम अधिक तपास करीत आहेत.
घरातून सोन्याचे दागिणे चोरले ; शेत शिवारातून सोलार आणि केबल चोरले
