कै. मारोतराव हंबर्डे यांना मान्यवरांकडून अभिवादन
नांदेड (प्रतिनिधी)- कै. मारोतराव होनाजी हंबर्डे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि 26 जानेवारी सोमवार रोजी सकाळी 10 वा. ह.भ.प. शब्दप्रभू नरेंद्र महाराज गुरव यांचा भव्य कीर्तन सोहळा पार पडला.
कै. मारोतराव होनाजीराव हंबर्डे यांनी आयुष्यभर वारकरी संप्रदायाचा प्रसार व प्रचार केला. देव देश धर्माची सेवा केली. त्यांच्या स्मरणार्थ गेल्या १४ वर्षापासून हंबर्डे परिवाराच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. 26 जानेवारी रोजी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित ह.भ.प. शब्दप्रभू नरेंद्र महाराज (मालेगाव,नाशिक) यांच्या अमृतवाणीतील कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी पालकमंत्री अतुल सावे, खासदार डॉ. अजित गोपछडे, ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर , हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर संघटन मंत्री संजय कोडगे,आ.प्रतापराव पाटील चिखलीकर, आ.बालाजीराव कल्याणकर,आ.आनंदराव बोढरकार,भाजपा महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर,माजी आ ओमप्रकाश पोकर्णा ,जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, चैतन्य बापू देशमुख यांच्यासह आजी -माजी खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी,नवनिर्वाचित नगरसेवक तसेच जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, आर्थिक, औद्योगिक, व्यापार आणि विविध क्षेत्रांतील सर्व मान्यवर, हंबर्डे परिवारावर प्रेम करणारा परिवार हजारोंच्या संख्येने उपस्थित होता.

ह.भ.प. शब्दप्रभू नरेंद्र महाराज गुरव यांच्या सुश्राव्य व समाज प्रबोधनात्मक कीर्तनाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले होते. तत्पूर्वी पालकमंत्री अतुल सावे,खासदार डॉ. अजित गोपछडे व संघटन मंत्री संजय कोडगे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मारोतराव होनाजी हंबर्डे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ह.भ.प. शब्दप्रभू नरेंद्र महाराज गुरव यांचा आशीर्वाद घेतला.
