नांदेड (प्रतिनिधी) – दि. २० व २१ जानेवारी २६ रोजी दोन दिवसाची केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय द्वारा आयोजित राज्यस्तरीय संस्कृत शास्त्र प्रतियोगिता नाशिक येथे घेण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील विविध संस्थेकडून विद्यार्थी आले होते. विविध प्रकारच्या शास्त्र प्रतियोगिता आयोजित करण्यात आल्या त्यामध्ये दहा कंठपाठ स्पर्धा होत्या जसे काव्य कंठपाठ, दर्शन कंठपाठ, उपनिषद् कंठपाठ, सुभाषित कंठपाठ, चरक संहिता, अष्टाध्यायी कंठपाठ, वाल्मिकी रामायण, गीता, अमरकोष, धातुरूप कंठपाठ. यामध्ये स्वामी विरजानंद दंडी कन्या गुरुकुल, अहिल्यानगर मधिल दहा कन्यांनी भाग घेतला होता. त्यामधिल पाच कन्या चा प्रथम क्रमांक व आनंदी- अष्टाध्यायी कंठपाठ द्वितीय स्थान प्राप्त केले. यामधिल पाच जनांचा तामिळनाडू येथील अखिल भारतीय प्रतियोगितेसाठी आपली जागा पक्की करून गुरुकुलसाठी ऐतिहासिक कामगिरी केली. तसेच गुरुकुलच्या कन्यांचा आत्मविश्वास, शुध्द उच्चारण, सादरीकरण, विनम्रता पाहून मंचावरील परिक्षक, समोर बसलेले विद्वानांना प्रभावित केले. प्रतियोगीतेचे परीक्षक म्हणून डॉ. प्रकाशचंद्र, डॉ.दत्ता टेनसे, डॉ.हंसधर झा, डॉ.एकनाथ कुलकर्णी यांनी प्रतियोगीतासाठी यशस्वी परीक्षण केले.
आचार्यांजी सोबत ऋतज्ञा, प्रमिति यांनी स्पर्धेसाठी दिवस रात्र परिश्रम घेतले. गुरुकुलची माताजींनी सर्वांचे अभिनंदन केले अशीच गुरुकुल ची यशस्वी परंपरा कायम राहावी यासाठी शुभेच्छा व आशिर्वाद दिला.

