नांदेड –डॉ. आंबेडकर नगर येथील ज्येष्ठ उपासक व रास्तभाव दुकानदार प्रकाश किशनराव लांडगे कोलंबी कर वय 69 वर्ष यांचे आज दिनांक 27 जानेवारी 2026 मंगळवारी पहाटे एक वाजून पन्नास मिनिटांनी दीर्घ आजाराने दुःख निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी 2 वाजता राहते घर डॉ. आंबेडकर नगर त्रिरत्न बौद्ध विहार जवळून निघणार असून शांतीधाम गोवर्धनघाट नांदेड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ, भावजया, दोन मुले, एक मुलगी, चार बहिणी, मेहुणे असा परिवार आहे.
आंबेडकरी चळवळीतील भारिप बहुजन महासंघाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष स्मृतीशेष राजाभाऊ ढाले, भारिप बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा मीराताई आंबेडकर यांच्याशी चळवळीच्या माध्यमातून निकटचा संबंध होता. लहानपणापासून धम्म चळवळीकडे त्यांनी वाहून घेतले होते. स्मृतीशेष राऊत काका, पीपल्स एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष, बावरी नगर धम्म परिषद मुख्य संयोजक डॉ. एस. पी. गायकवाड, फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार सुरेशदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यामध्ये भारतीय रिपब्लिकन पक्ष व भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून त्यांनी समाज उपयोगी कार्य केले होते. निस्वार्थी भावनेने सतत सामाजिक, राजकीय, अनेक क्षेत्राशी निगडीत होते. त्यांच्या निधनाने लांडगे परिवार व डॉ. आंबेडकर नगर, कोलंबी वासियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे . कश्यप, कनिष्क, साकी यांचे ते वडील होत.दक्षिण मध्य रेल्वे सेवानिवृत्त अधिकारी सारीपुत्र लांडगे , महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नांदेड विभागातील कर्मचारी अनिल लांडगे यांचे ते मोठे बंधू होत.
