विश्र्वशांती महायज्ञ कार्यक्रमाचे स्विकारले निमंत्रण
नांदेड(प्रतिनिधी)-गोपाळचावडी येथे होवू घातलेल्या विश्र्वशांती महायज्ञ व श्री केदारनाथचे जगद्गुरू श्री.श्री.श्री.1008 भिमाशंकरलिंग महास्वामीजी यांच्या जगद्गुरु पट्टाभिषेक रजत महोत्सव सोहळा दि.5 फेबु्रवारी ते 12 फेबु्रवारी या कालावधीत पार पडणार आहे. या अनुशंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नांदेड दौर्यावर असता गोपाळचावडी येथे श्री केदार जगद्गुरु यांचे दर्शन घेवून आशिर्वाद घेतला व होवू घातलेल्या विश्र्वशांती महायज्ञ कार्यक्रमाचे निमंत्रणही स्विकारून उपस्थिती लावण्याचे सांगितले.
यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री अतुल सावे, ना.गिरीश महाजन, खा.अशोक चव्हाण, खा.अजित गोपछडे,खा.भागवत कराड,भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण, आ.तुषार राठोड, नगरसेवक किशोर स्वामी यांच्यासह आदींची यावेळी उपस्थिती होती.नांदेड शहरा लगत असणार्या गोपाळचावडी येथे 108 विश्र्वशांती महायज्ञ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्य्रकमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही उपस्थिती राहणार असल्याची माहिती प्राप्त झाली असून या कार्यक्रमाला महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, दिल्ली या भागातून भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येणार असून जवळपास 20 ते 25 एकर परिसरात भव्य असे मंडप उभारण्यात येत आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहावे असे निमंत्रण श्री.श्री.श्री.1008 केदार जगद्गुरू यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला केदार जगद्गुरूंचा आशिर्वाद
