नांदेड:- ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त डाक विभागामार्फत महिला सन्मान बचत पत्र योजना व सुकन्या समृद्धी बचत खाते योजना प्रचार प्रसार अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त डाक विभागातर्फे विविध पोस्टल योजनांद्वारे महिलांना सक्षम करण्यासाठीची माहिती महिला गुंतवणूकदारांना देण्याकरिता डाक विभागातर्फे महिला दिवस पर महिला सशक्तिकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेदरम्यान महिला गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिस मधील महिला बचत सन्मानपत्र योजना, सुकन्या समृद्धी बचत खाते आदी संदर्भात घरोघरी जाऊन डाक विभागाचे कर्मचारी, पोस्ट कर्मचारी महिलांना माहिती देणार आहे.नांदेड जिल्ह्यातील सर्व महिला मुलींनी महिला सन्मान बचत पत्र योजना, सुकन्या समृद्धी बचत खाते योजना, यामध्ये गुंतवणूक करावी, असे आवाहन नांदेड विभागाचे डाक घर अधीक्षक राजू पालेकर यांनी केले आहे.