नांदेड़(प्रतिनिधि)- विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गनी कॉलनी परिसरात घरफोडीची घटना घडली असून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून १ लाख ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी शेख दाऊद शेख मेहता यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, दिनांक १६ जानेवारी २०२6 रोजी सायंकाळी ५.३० वाजता ते १८ जानेवारी २०२6 रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत गणि कॉलनी येथील त्यांचे घर बंद होते. घराला कुलूप लावलेले असताना अज्ञात चोरट्यांनी ते कुलूप तोडून घरात प्रवेश केला.घरातील कपाटाची झडती घेत चोरट्यांनी त्यामधील १ लाख ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला.या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 16/2026 नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.
