नांदेड (प्रतिनिधी)- श्री गुरु गोबिंद सिंघजी यांचे विचार भारताला नव्हे तर ते विश्वाला मार्गदर्शक होते. असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी आज येथील पीपल्स महाविद्यालयात केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या श्री गुरु गोबिंद सिंघजी अध्यासन संकुल व पीपल्स महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संत सीपाही श्री गुरू गोबिंद सिंघजी या विषयावर आयोजित विंग कमांडर (नि) विजय चतुर यांच्या व्याख्यान प्रसंगी केले.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे, सचिव सौ. श्यामल पत्की, सहसचिव प्रफुल अग्रवाल, नौनिहाल सिंघ जहागीरदार, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. डी. एन. मोरे, प्राचार्य रावसाहेब जाधव, डॉ. दीपक शिंदे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. चासकर म्हणाले की, विद्यापीठातील श्री गुरु गोबिंदसिंघजी अध्यासन संकुल हे संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत दर्जेदार व नावाजलेले कसे असेल या दृष्टीने काम केले जाईल. आगामी काळात या केंद्रातून संशोधन करण्यावर भर दिला जाईल.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा कार्यभार स्वीकाल्या नंतर पहिला सार्वजनिक कार्यक्रम पीपल्स महाविद्यालयात विद्यापीठ आणि पीपल्स महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने होत असल्याचा आनंद व्यक्त करत स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या संस्थेत सर्व प्रथम आल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
विंग कमांडर (नी) विजय चतुर यांनी श्री गुरु गोबिंद सिंघजी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला, गुरु गोबिंद सिंघजी यांनी औरंजेबाला पाठवलेल्या पत्राचा उल्लेख करत या पत्राचा अनुवाद सरळ सोप्या भाषेत समजावून दिला.
यावेळी डॉ. व्यंकटेश काब्दे यांचे ही समयोचित भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य जाधव व डॉ. दिपक शिंदे यांनी केले तर आभार डॉ. विकास सुकाळे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा सावळे ह्यांनी केले.
यावेळी अधिसभा सदस्य डॉ. बी. एस. सुरवसे, उपप्राचार्य डॉ. सचिन पवार, डॉ. अनंत राऊत, डॉ भानेगावकर, डॉ. मथु सावंत, डॉ. गहिलोत, डॉ. वाडवळे, डॉ. दत्ता यादव, डॉ. कैलास यादव सरदार आहुवालीया, आसाराम काटकर यांच्या सह प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्मारकास भेट
कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी स्वामी रामानंद तिर्थ यांच्या स्मारकास भेट देऊन स्वामीजींना आदरांजली वाहिली त्यानंतर त्यांनी नरहर कुरुंदकर स्मारकास भेट देऊन माहिती घेतली. दीपनाथ पत्की व श्यामल पत्की यांनी कुलगुरू डॉ. चासकर यांचे स्वागत केले.