भोकर – भारतीय स्वातंत्र्यलढ्याततील नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रभक्त, निर्भीड विचारांचे आणि सशस्त्र क्रांतीच्या ध्ययाचे प्रतिक म्हूणन अजरामर झाले.” तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा ” ही त्यांची गर्जना ब्रिटिश राजवटिला आव्हान देणारी होती अशी क्रांतिकारी व्यक्ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती तसेच मराठी मनाचा मान बिंदू, हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज दि. २३ जानेवारी २०२६ रोजी डॉ. प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरी करण्यात आली. नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ मंगेश पवळे, दंत सर्जन डॉ मायदेवी नरवाडे, आयुष डॉ. विनायक थोरवट, आरबीएसके वैद्यकीय अधिकारी डॉ वेंकटेश टाकळकर,औषध निर्माण अधिकारी शिवप्रसाद जाधव, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बालाजी चांडोळकर, एचएलएल योगी जाधव, लिपिक प्रल्हाद आप्पा होळगे,अधिपरिचारिका भालेराव, भिसे, करंडेकर आरोग्य कर्मचारी योगेश पवार, आरोग्य मित्र सुधाकर गंगातिरे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
