किनवट येथे बोलींचा जागर कार्यक्रम संपन्न 

किनवट (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त बोलींचा जागर हा कार्यक्रम दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी  सरस्वती विद्यामंदिर कला महाविद्यालय किनवट येथे घेण्यात आला. मराठी भाषा ही विविध बोलींनी नटलेली समृद्ध व संपन्न भाषा आहे मराठीच्या विविध बोली या मराठी भाषेचे वैभव आहेत बोलीभाषा ही महाराष्ट्राच्या विशिष्ट प्रदेशात व भागात बोलली जाणारी मराठी भाषेची प्रादेशिक अभिव्यक्ती आहे मराठी भाषेच्या या विविध बोलींचे जतन संवर्धन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने  मराठी भाषा व उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या संकल्पनेनुसार व भाषा संचालनालयाचे संचालक अरुण गीते यांच्या मार्गदर्शनानुसार  मराठी भाषा संवर्धन पंधरवडा संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये साजरा करण्यात येत आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व सरस्वती विद्या मंदिर कला महाविद्यालय किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात बोलींचा जागर करताना अतिशय दुर्मिळ अशा कोलामी बोली या भाषेवर विचार मंथन करण्यात आले. शोभायात्रा आदिवासी लोककलांचे सादरीकरण, संवाद व बोलींचे वैशिष्ट्य यासोबतच बोलीभाषा अभ्यासक व तज्ञांचे मार्गदर्शन या कार्यक्रमात झाले.

कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव नेमानेवार यांच्या हस्ते झाले भाषा अभ्यासक  प्राचार्य डॉ. आनंद भंडारे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख व भाषा संचालनालयाचे सल्लागार  व भाषेचे अभ्यासक प्रोफेसर डॉ पृथ्वीराज  तौर, कोलामी बोलीचे अभ्यासक प्रज्ञा प्रतिष्ठान अध्यापक महाविद्यालय नांदेड चे प्राचार्य डॉ. राजू मोतेराव यांनी बोलीचे वैशिष्ट्य व काळानुसार लोकपाबत चालत असलेल्या बोलीं यांची कारण  मीमांसा,, समस्या व उपाययोजना  याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्राचार्य भंडारे यांनी अध्यक्षीय समारोप करताना  युवा पिढीची आणि समाजाची बोली संवर्धनासाठी आवश्यक असलेली भूमिका विशद करत आपल्या परिसरातल्या बोली संवर्धनाच्या कामासाठी युवकांनी अभ्यासकांनी पुढे यावे असे आवाहन केले.  संस्थेचे सचिव मुख्याध्यापक कृष्णकुमार नेमानीवार महाराष्ट्र शासनाच्या भाषा विभागाचे भारत जाधव सुधाकर महाजन व राहुल सूर्यवंशी, सरस्वती कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य डॉ. किरण पाईकराव, संत भगवान बाबा कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आनंद भालेराव   उच्च माध्यमिक विद्यालयाचे सुपरवायझर  प्रा रेणुकादास पहूरकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी किनवट परिसरातील महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचा आदिवासी गिरीजन पुरस्कार विजेते मोहन मेश्राम व कौशल्याबाई मेश्राम, लक्ष्मी टिळक उत्कृष्ट वांग्मय पुरस्कार विजेते डॉ. वसंत राठोड 2025 चा कृष्ण वाद्य निर्मिती पुरस्कार विजेते भालेराव दडांजे यांचा यावेळी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. शक्ती नगर घुगरवाडी येथील कोलाम महिला व पुरुषांच्या संचाने विविध प्रकारची गीत प्रस्तुत केली. पाटा गायक मोहन मेश्राम व कौशल्याबाई मेश्राम राजेश्वर मेश्राम यांनी किंगरी वाद्यावर पाटा गायन केले. माध्यमिक शाळेतील शिक्षक करण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींचे लेझीम पथक, वारकरी संप्रदायाचे देवबाजी केंद्रे व सौ प्रमिलाबाई केंद्रे यांच्या टाळ विना यांच्यासह  वारकरी भजन व परमेश्वर मेश्राम आणि राजेश्वर मेश्राम यांच्या आदिवासी पेपर वादनासह संकुल परिसरात शोभायात्रा काढण्यात आली यात महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी व सरस्वती शिक्षण संस्थेतील वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक कर्मचारी उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे यात सहभागी झाले. दीप प्रज्वलन महाराष्ट्र राज्य गीत व विशाखा होळंबे आणि खुशी चव्हाण यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. मराठी विभाग प्रमुख व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ मार्तंड कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले भाषा विभागाचे भारत जाधव यांनी शासनाची या कार्यक्रमाची भूमिका विशद केली. डॉ सुनील व्यवहारे यांनी सूत्रसंचालन केले डॉ किरण आईनेनीवार यांनी आभार व्यक्त केले  या कार्यक्रमात किनवट व माहूर परिसरातील विविध बोलींचे संकलन व संवर्धन करण्यासाठी सरस्वती महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या बोली संवर्धन प्रकल्पाची माहिती माहिती उपस्थित त्यांना देण्यात आली, राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!