24 व 25 जानेवारीचा प्रवास बंद रस्ते पाहून नांदेडच्या नागरिकांनी करावा 

नांदेड – “हिंद-दी-चादर” या कार्यक्रमानिमित्त दिनांक 24 व 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड शहरात देशातील व राज्यातील अनेक अतिमहत्वाचे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री मंत्री अमित शाह,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दिल्लीच्या मुख्यमंत्री श्रीमती रेखा गुप्ता, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह इतर मान्यवरांचा समावेश आहे. हे सर्व मान्यवर नांदेड येथील मोदी मैदान येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास देश-विदेशातून मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल होणार असल्याने नांदेड शहरात वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील शांतता, सुव्यवस्था व वाहतुकीचे सुरळीत नियोजन राखण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक 24 व 25 जानेवारी 2026 रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत वाहतूक नियमनाबाबत अधिसूचना निर्गमित केली आहे.

या कालावधीत व्हीव्हीआयपी दौऱ्यादरम्यान तात्पुरत्या स्वरूपात आसना ब्रिज–शंकरराव चव्हाण चौक–गुरुद्वारा मालटेकडी रोड–मालटेकडी ओव्हरब्रिज, नमस्कार चौक ते नाईक चौक, अण्णाभाऊ साठे पुतळा, हिंगोली गेट ओव्हरब्रिज, चिखलवाडी चौक, आय.टी.आय. ते अण्णाभाऊ साठे पुतळा, अण्णाभाऊ साठे पुतळा ते नाईक चौक (आनंदनगरकडे), हिंगोली गेट अंडरब्रिज ते अण्णाभाऊ साठे पुतळा, चिखलवाडी ते हिंगोली गेट ओव्हर/अंडरब्रिज, चिखलवाडी ते गुरुद्वारा हनुमान मंदिर–भगतसिंग चौक, बर्की चौक ते जुना मोंढा मार्गे वजिराबाद, कविता हॉटेल ते जुना मोंढा कौठा, एम.जी. हेक्टर शोरूम ते साई कमान कौठा, भगतसिंग चौक ते श्रीराम चौक (पूर्व बाजू), अहिल्यादेवी होळकर चौक–मामा चौक, बी.डी.डी.एस. ऑफिस ते मामा चौक–श्रीराम चौक, लिंबगाव ते वाघी रोड–हसापूर मार्ग (कार्यक्रमास येणारी वाहने वगळून), रविनगर ते नागार्जुन शाळा तसेच कौठा चौकी ते रविनगर, बसवेश्वर पुतळा ते अहिल्याबाई होळकर चौक–पदमजासिटी–भगतसिंग चौक हे मार्ग वाहतुकीस बंद राहणार आहेत.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून चिखलवाडी–अण्णाभाऊ साठे पुतळा–नाईक चौककडे जाणारी वाहतूक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, कोर्टाच्या पाठीमागून हिंगोली गेट अंडरब्रिज मार्गे गोकुळनगरकडे वळविण्यात येईल. तसेच वजिराबाद चौक–आय.टी.आप–नवीन मोंढा–महादेव दाल मिल मार्ग, महादेव दाल मिल रोड क्रमांक 26, शिवाजी महाराज पुतळा–रेल्वे स्टेशन–हिंगोली गेट, बसवेश्वर चौक ते लातूर फाटा, लिंबगाव–भवानी चौक–छत्रपती चौक मार्गे वाहतूक सुरू राहील.

नागरिकांनी दिनांक 24 व 25 जानेवारी 2026 रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन नांदेड जिल्हा पोलीस दलाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!