नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या 75 व्या वर्षानिमित्त मागील वर्षभरापासून सुरु असलेल्या अमृत महोत्सवा निमित्त सुरु असलेल्या उपक्रमांचा समारोप समारंभ शनिवार, दि. 24 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता सायन्स कॉलेज, नांदेड येथील खुल्या मंचावर आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, आरोग्यसेना पुणेचे संस्थापक डॉ.अभिजीत वैद्य, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.मनोहर चासकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
मराठवाड्यासारख्या मागास भागात शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी हैद्राबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्रता सैनानी प.पु.स्वामी रामानंद तिर्थ यांनी नांदेड येथे सुरुवातीला पिपल्स महाविद्यालय व त्यानंतर नांदेड एज्युकेशन सोसायटी स्थापन करुन त्या अंतर्गत पिपल्स महाविद्यालय, सायन्स कॉलेज, पीपल्स हायस्कूल या मुल्याधिष्टीत शिक्षण देणार्या संस्था 75 वर्षापूर्वी निर्माण केल्या. 2025-26 हे नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अमृत महोत्सवी वर्ष होते. यानिमित्त संस्थेच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. या अमृत महोत्सवी उपक्रमांचा समारोप येत्या शनिवार, दि. 24 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता सायन्स कॉलेज, नांदेड येथील खुल्या मंचावर आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार तथा नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी खा.डॉ. व्यंकटेश काब्दे हे राहणार आहेत. कार्यक्रमास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मा. मेधाताई पाटकर तसेच पुणे येथील आरोग्यसेनेचे संस्थापक डॉ. अभिजीत वैद्य, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर हे उपस्थित राहणार आहेत.

या समारंभास विद्यार्थी, पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अमृत महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष सीए डॉ. प्रविण पाटील, सचिव प्रा. सौ. श्यामल पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत महोत्सवानिमित्त वर्षभर शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या समारोप समारंभाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यकारिणी सदस्यांनी विशेष सहकार्य केले आहे. त्यामध्ये स.नौनिहालसिंघ जहागीरदार, ऍड. चिरंजीलाल दागडिया, ऍड. प्रदीप नागापुरकर, डॉ. अविनाश शिंदे, प्रा. एकनाथ खिल्लारे, डॉ. यशपाल भिंगे, प्रा.विलास वडजे, राहुल गोरे, प्राचार्य डॉ. लक्ष्मण शिंदे, प्राचार्य डॉ. शिवशंकर भानगावकर व मुख्याध्यापक नितीन सेलमोकर आदींनी केले आहे.