शिक्षक सेनेचा जिल्हास्तरीय मेळावा शिक्षकांसाठी प्रेरणादायी

माजी आमदार रोहीदास चव्हाण यांचे प्रतिपादन; शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडविण्याची शिवसेनेची ग्वाही
नांदेड- महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या नांदेड जिल्हा शाखेने आयोजित केलेला जिल्हास्तरीय मेळावा जिल्ह्यातील तमाम शिक्षक शिक्षिकांसाठी प्रेरणादायी झाला असल्याचे प्रतिपादन शिवसेना (उबाठा)चे माजी आमदार तथा संपर्क प्रमुख रोहिदास चव्हाण यांनी केले. ते मेळाव्याचे उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष विठुभाऊ चव्हाण, प्रमुख पाहुणे शिवसेना जिल्हाप्रमुख भुजंग पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख बबन बारसे, शिवसेना महानगर प्रमुख प्रकाश मारावार, शिक्षक सेनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष बाळासाहेब राखे, परभणी जिल्हाध्यक्ष सायस चिलगर, युवा शहर प्रमुख नवज्योतसिंग गाडीवाले, उपजिल्हा प्रमुख पाशाभाई, रामराव मोरे, मधुकर मठपती, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर, परशुराम येसलवाड, तानाजी पवार आदींची उपस्थिती होती.
                              शहरातील हाॅटेल विसावा पॅलेस येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जिल्हा शाखा नांदेड चा जिल्हास्तरीय मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दीपप्रज्वलनाने मेळाव्यास प्रारंभ करण्यात आला. शिक्षकांचे सर्वच प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी शिवसेना ( उबाठा) कटिबद्ध असल्याची ग्वाही मान्यवरांनी दिली. शिक्षक सेना पदाधिकारी शिक्षक सैनिक व  यांच्या पाल्यांनी साहित्य, शैक्षणिक, कला क्रीडा, सांस्कृतिक, राष्ट्रीय कार्य, संघटनात्मक विशेष कामे केली यांचा सत्कार व सन्मान करुन प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.  यावेळी महिला जिल्हा उपाध्यक्षा पंचफुला वाघमारे व बालाजी बनसोडे सर यांना केंद्र प्रमुख जिल्हा प्रतिनिधी पदी नियुक्ती करुन नियुक्ती पत्र देण्यात आले.
                             मेळाव्याचे प्रास्ताविक शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर यांनी केले. स्वागतगीत जिल्हा संघटक गोविंद सुवर्णकार यांनी आपल्या सुरेल आवाजात गायले. जिल्हाध्यक्ष तानाजी पवार, प्रा. परशुराम येसलवाड, बिलोली तालुकाध्यक्ष बालाजी गेंदेवाड, बाळासाहेब राखे, भुजंग पाटील, प्रकाश मारावार यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक काशीनाथ शिरसीकर व शिवकन्या पटवे यांनी केले तर आभार रवी बंडेवार यांनी केले. यावेळी शिक्षक सेनेत अनेक शिक्षकांनी प्रवेश केले. या वेळी शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष विठुभाऊ चव्हाण यांनी शिक्षक सेनेच्या कामाचा आढावा घेऊन सविस्तर विवेचन केले. मेळाव्याच्या  दुसऱ्या सत्रात  संघटन मजबूत करणे, ध्येय धोरणे ठरविणे, शाखा विस्तार करणे, प्रलंबित प्रश्न बाबत दिशा ठरवणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
                                मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी गंगाधर कदम, गोपाल बंड्रेवार, गंगाधर करेवार, सचिन पाटील, अल्पसंख्याक चे शेख मुस्तफा, उपाध्यक्ष गंगाधर ढवळे, वसंत सिरसाट, राजेश पवार, प्रकाश कांबळे प्रकाश फुलवरे शिवकन्या पटवे शोभा गिरी मॅडम, केंद्र प्रमुख प्रतिनिधी बालाजी बनसोडे सर, बालाजी राजूरवार, अनिरुद्ध सिरसाळकर, संतोष किसवे, गोविंद सुवर्णकार, सचिन रामदिनवार, हमीद मोमीन, तालुका अध्यक्ष बालाजी गेंदेवाड, दिलीप पांचाळ, प्रकाश फुलवरे, नारायण लोखंडे, रामदास देशमुख सर, पानगंटवार सर, दत्ता पेंढारकर सर,  पुंडलिक कारामुंगे, राजाराम कसलोड,संगेश पवार, बसपा कारखेडे, अनिल गवंडगावकर, बालाजी केंद्रे, सचिन कळसे, प्रा.सतीश धोंडगे, गायकवाड सर, रमन काब्दे,माधव उलिगडे,सरला शिवपुजे, सुनिता मिठ्ठेवाड , संतोष घटकार,ऊत्तम डोंमपल्ले,बंड्डापा स्वामी,संभाजी केंद्रे,मेकाले सर,कुमार कांबळे सर आदी शिक्षक सेनेच्या पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!