संपन्न अशी ‘पंजाबी भाषा’

शिख धर्मियांचे 9 वे गुरू ज्यांना ‘हिंद दि चादर’ म्हणून ओळखले जाते ते श्री गुरू तेग बहादूर साहिब यांचा 350 वा शहिदी समागम नांदेड येथे 24 व 25 जानेवारी, 2026 या कालावधीत होत आहे. या निमित्ताने या धर्माबाबत अल्प स्वरूपात माहिती आपणास असली पाहिजे.

गुरू-शिष्य यांची परंपरा असलेल्या या मानवतावादी धर्मात शिष्य हा महत्वाचा या अर्थाने संस्कृत भाषेतून घेतलेला हा शब्द म्हणजे शीख  ( शिष्य ) होय. पंजाब प्रांतात पंजाबी भाषा प्रामुख्याने बोलली जाते. ही भाषा ज्या लिपीत आहे ती लिपी म्हणजे गुरूमुखी होय. तर पाकिस्तान विभाजनानंतर पकिस्तानात गेलेल्या पंजाब प्रांतात याच बोलीसाठी शाहमुखी लिपी वापरली जाते.भाषिक वैशिष्ट्य बघताना ही लिपी इंडो-आर्यन आहे. पंजाबी गुरूंनी स्वीकारलेली व ज्या भाषेत रचना केल्या गेल्या व ज्यात श्री गुरू ग्रंथ साहिब आहे ती गुरूमुखी लिपी 11 ते 12 व्या शतकात प्राकृत भाषेपासून आजपर्यंत आली आहे.

पाकिस्तानातील पंजाब प्रांतात वापरला जाणाऱ्या शाहमुखी लिपीवर लगतच्या पारशी (पर्शियन) आणि अरबी शब्दांचा प्रभाव अधिक आहेत. जगभरात असलेल्या साधारण 2 कोटीहून अधिक पंजाबी भाषकांची भाषा मुळ पंजाबी हीच आहे.देशात पंजाब राज्याची प्रमुख अशी असणाऱ्या पंजाबी भाषेला लगतच्या हरयाणा आणि दिल्ली राज्यातही अधिकृत भाषा म्हणून ओळख मिळालेली जगात कॅनडा, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, ऑस्ट्रेलिया आदी देशात पंजाबी भाषकांची संख्या अधिक आहे.

पाकिस्तानात असलेल्या पंजाब प्रांतात देखील पंजाबी ही सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. पंजाबमध्ये भाषिक महत्व लक्षात घेऊन भाषेच्या नावाने असणारे पंजाब विद्यापीठ आहे. याची स्थापना 30 एप्रिल, 1969 रोजी पतियाला येथे करण्यात आली. या ठिकाणी पंजाबी भाषा संशोधन व तंत्रज्ञान शाखा आहे. या केंद्रातर्फे ऑनलाईन पंजाबी भाषेचा वापर तसेच सॉफ्टवेअर निर्मितीचे काम सातत्याने सुरू आहे. याचा माध्यमातून पंजाबी सायबर कमिटीला व सायबर क्षेत्रातील प्रत्येकाला मदत होत आहे.पंजाबी भाषेबाबतचा विश्वकोष अर्थात Encyclopedia तयार करण्यात आला असून हा ऑनलाईन विश्वकोष पतियाला येथील विद्यापीठाने 2014 साली पंजाबीपिडीया (Punjabipedia) उपलब्ध करून दिला आहे.

1954 साली पंजाबी साहित्य अकादमीची स्थापना करण्यात आली असून याला पंजाब राज्य शासन भाषक प्रस्तावासाठी मदत करीत आहे. पंजाबी साहित्य अकादमी पुरस्कार साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी 1955 पासून सुरू करण्यात आला आहे. ज्ञानपीठ नंतर दुसऱ्या क्रमांकाचा हा पुरस्कार मानला जातो.या खेरीज कॅनडा-भारत शिक्षण संस्थेतर्फे प्रतिवर्षी ढाहान पुरस्कार देखील दिला जातो.

 पंजाब आणि महाराष्ट्र यांना जोडणारा महत्वाचा दुवा संत नामदेवांच्या रचना आहेत. त्यांच्या रचना शिख धर्मग्रंथात समाविष्ट आहेत. याच निमित्ताने 2015 साली संत नामदेवांची पंजाबातील कर्मभूमी असलेल्या घुमान येथे 88 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्यात आले होते.संवाद हा भाषेतूनच पुढे जातो. त्याच संवादाचा सेतू नांदेड नगरीत ‘हिंद-दि-चादर’ श्री. गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागमातून होणार आहे. भक्ती हा मार्ग आणि त्याचसाठी भाषा हे साधन याची प्रतिती या काळात नक्की येईल.

(संदर्भ : पंजाब विद्यापीठ व विकिपिडीया)

– प्रशांत दैठणकर

9823199460

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!