2025 मध्ये नांदेडमध्ये वाढदिवस साजरा होऊ नये यासाठी अनेकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. परंतु “सूर्य उगवायला कुणाची परवानगी लागत नाही” तुमच्या स्वतःच्या तेजाने ते सारे प्रयत्न आपोआप अंधारात गडप झाले. आज पुन्हा एकदा, त्याच आत्मविश्वासाने, आपण दुसरा वाढदिवस साजरा करत आहात. हेच तुमच्या कार्यकर्तृत्वाचे जिवंत प्रमाण आहे. कर्दनकाळ हा शब्द जर कुणासाठी योग्य ठरत असेल, तर शहाजी उमाप यांच्यासाठी. कर्दनकाळ तो आहे अन्याय करणाऱ्यांसाठी.“जिथे प्रकाश पोहोचतो, तिथे अंधार टिकत नाही” आणि तुम्ही जिथे जाता, तिथे आपला प्रकाश सोबत नेताच. तुमच्या कार्यपद्धतीमुळे चुकीचे काम करणाऱ्यांचे जगणे कठीण होते, पण प्रामाणिक माणसासाठी तुम्ही नेहमीच आधारवड ठरलात. कठोरता तुमच्या कामात आहे, आणि माणुसकी तुमच्या वागण्यात ही दुर्मीळ सांगड फार थोड्यांकडे असते.
नांदेडचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय संदीपजी बिष्णोई यांनी तुम्हाला “उत्कृष्ट नेता” असे संबोधले होते, आणि ते विशेषण तुम्ही प्रत्येक दिवस तुमच्या कृतीतून त्यांचे शब्द आज पर्यंत सिद्ध केले आहे.आणि जीवनभर करणारच आहेत याची आम्हाला खात्री आहे. समोर आलेल्या प्रश्नांकडे तुम्ही कधीही एकांगी नजरेने पाहिले नाही.“एकतर्फी न्याय म्हणजे दुसऱ्या बाजूचा अन्याय” हे तत्व तुम्ही कायम जपले आणि दोन्ही बाजू समजून घेऊन योग्य निर्णय दिला.तरी पण आपल्या समोर नांदेड मध्ये आलेले अनेक प्रश्न आज सुद्धा प्रलंबित आहेत.त्यांना नक्कीच मार्गी लावतात अशी अपेक्षा आहे.
तुमची एक शिकवण विशेष उल्लेखनीय आहे,“संघर्षाच्या काळात माणूस एकटाच असतो, यश मिळाल्यावर मात्र सगळी दुनिया सोबत असते.”या विचारांच्या आधारावर अनेकांचे आयुष्य इंद्रधनुष्याच्या रंगांसारखे फुलले आहे.“भविष्य घडवायचे असेल,तर भूतकाळाकडून शिकायला हवे” या तत्त्वज्ञानातूनच तुम्ही महाराष्ट्र पोलीस सेवेत दाखल झाला आणि आज भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी म्हणून कार्य करत आहात. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या भारतीय पोलीस सेवेतील बहुतेक सर्वच अधिकाऱ्यांना ‘शहाजी’ हे नाव माहीत आहे. कारण शहाजी उमाप यांच्यातील बाणेदार पणा ते जाणतात. आणि त्यांना ते नाव सहज विसरता येत नाही.
नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर हे जिल्हे तुमच्या पोलीस परिक्षेत्रात येतात. मुख्यालय नांदेडला असल्यामुळे येथील सामान्य माणसावर तुमच्या छत्रछायेसारखा आधार आहे. आर. के. लक्ष्मण यांच्या कॉमन मॅन ला जर कुणी वाली असेल,तर तो शहाजी उमाप आहे असे अनेक सामान्य नागरिक मनोमन म्हणतात.तुमच्या कार्यकाळातही इतिहासातल्या मीर सादिक, मीर कासिम, सूर्याजी पिसाळ यांसारखी प्रवृत्ती डोके वर काढण्याचा प्रयत्न करत होती. परंतु “ज्याच्या मनात सत्य, त्याच्या हातात शक्ती” या बळावर तुम्ही त्या सर्व प्रयत्नांनातटस्थ, सक्षम आणि निर्भीड नेतृत्वाने चोख प्रत्युत्तर दिले.संपूर्ण सेवाकाळात “मी कुणासाठी काय केलं” यापेक्षा “माझ्यासाठी कुणी काय केलं” हे लक्षात ठेवणे ही तुमच्या मोठेपणाची खरी ओळख आहे.
कामाचा व्याप इतका की श्वास घ्यायलाही उसंत नाही, तरीही तुम्ही खेळ आणि व्यायामासाठी वेळ काढता. “निरोगी शरीरातच निरोगी विचार जन्माला येतात” याचा प्रत्यय तुम्ही रोज देता. तुमचा हा शिस्तबद्ध दिनक्रम इतरांनाही प्रेरणा देतो.तुमच्यासाठी कमाई म्हणजे केवळ धन नव्हे अनुभव, नाती, मानसन्मान, संस्कार, आचार आणि विचार हीच तुमची खरी संपत्ती आहे.“कोणालाही न दुखवता जगणे” हा तुमच्या जीवनाचा मूलमंत्र आहे.तरी पण जो चुकला त्याला धडा देण्यासाठी आपण क्षणभर वेळ लावत नाहीत याची सुद्धा माहिती नांदेड परिक्षेत्रातील जनतेला आहे. जसं चंदन कापलं तरी त्याचा सुगंध जात नाही आणि ऊस पिळला तरी त्याचा गोडवा कमी होत नाही, तसंच कितीही अडथळे आले तरी तुम्ही तुमचे उदात्त गुण कधी सोडले नाहीत याचे मनापासून कौतुक वाटते.
गरुडाची एक कथा आहे. एक कावळा त्याच्या पाठीवर बसून त्याला चावण्याचा प्रयत्न करतो. परंतु गरुड त्याची चिंता करत नाही. तो कोणताही प्रतिकार न करता स्वतः उंच भरारी घेत आकाशात झेपावतो. उंची वाढत गेल्यावर कावळ्याला प्राणवायूची कमतरता जाणवते आणि अखेर तो आपोआपच खाली कोसळतो. हेच आपण आपल्या कृतीतून करून दाखवले आहे. अशा अनेक कावळ्यांना आपण अशाच प्रकारे खाली पाडले आहे, याची जाणीव आम्हालाच नव्हे तर संपूर्ण जगालाही आहे.

शेवटी, एका आपुलकीच्या सूचनेसोबत नम्रतेआड दडलेले कट आणि बाहेरून गोड बोलून आतून वार करणाऱ्या प्रवृत्ती यांच्याकडेही सतत लक्ष ठेवत राहा, जेणेकरून कुठलीही किरकोळ घटना तुमच्या कार्याला डाग लावू शकणार नाही. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी असंख्य अडचणींवर मात करून स्वराज्य उभं केलं. तुमच्याकडे तर केवळ चार जिल्ह्यांची जबाबदारी आहे आणि ती तुम्ही लीलया पेलत आहात. अशा या कर्तृत्ववान, निर्भीड, लोकाभिमुख आणि भारदस्त व्यक्तिमत्त्वाला
नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक पदावर असतांना साजरा होणाऱ्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त हार्दिक, मंगलमय शुभेच्छा!
– कंथक सूर्यतळ
