नांदेड(प्रतिनिधी)-महनगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या दि.30 डिसेबंर रोजी शेवटचा दिवस असल्याने प्रत्येक पक्षाने आप-आपले उमेदवार निवडणुकीत उभे करण्याची तयारी सुरू केली असतांनाच कॉंगे्रस पक्षाकडेही 20 प्रभागातील 81 सक्षम उमेदवार असल्याची माहिती खा.प्रा.रविंद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कॉंगे्रस पक्षाच्यावतीने समविचारी पक्षांसोबत आघाडीच्या संदर्भात जागा वाटपाची चर्चा पक्ष निरिक्षक माजी कॉंगे्रस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे नांदेडमध्ये तळ ठोकून आहेत. सोमवारी सकाळपासूनच त्यांनी विविध पक्षाच्या नेत्यांशी आघाडीच्या संदर्भात बोलणी सुरू केली असून यात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंगे्रस (शरद पवार), शिवसेना (ठाकरे), वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष, समाजवादी पक्ष याचबरोबर डाव्या पक्षांशीही त्यांची बोलणी सुरू आहे. यात रासपने 15 जागा आम्हाला देण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. या पाठोपाठ शिवसेना ठाकरे गटानेही किमान 16 जागा तरी आम्ळाला देण्यात याव्यात अशी मागणी केली. जो उमेदवार निवडूण येण्याची क्षमता आहे. अशा उमेदवारांंना प्राधान्य दिल जाणार, याचबरोबर जे माजी नगरसेवक आहेत. त्यांना पहिले प्राधान्य दिले जाणार. जे कॉंगे्रस पक्ष सोडून इतर पक्षात गेले ते अगोदरच कॉंगे्रसचे नव्हते. जे गेले त्यांची मिलीभगत अगोदरच होती. आता कॉंगे्रस पक्ष हा निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आणि खरी कॉंगे्रस असल्याचे मतही खा.चव्हाण यांनी व्यक्त केले. वंचित बहुजन आघाडीसोबत आमची जागा वाटपाच्या संदर्भाची चर्चा सुरू आहे. यावर सोमवारी रात्री उशीरापर्यंत सकारात्मक चर्चा समोर येवून आम्ही मतांचे विभाजन होणार नाही या दृष्टीकोणातून दोघेही एकोपाची भावना घेवून महापालिका निवडणुक एकत्र निवडणुक लढवू असा आशावाद खा.चव्हाण यांनी व्यक्त केला.
कॉंगे्रस पक्षात येणार्यांची संख्या आता मोठ्या प्रमाणात आहे. आमच्याकडे ही अनेक दिग्गज पक्षात येण्यासाठी संपर्कात आहेत. सोमवारी सकाळी पक्ष निरिक्षक माणिकराव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित नांदेड शहराचे प्रथम महापौर सुधाकर पांढरे यांनी पक्ष प्रवेश केला. या पाठोपाठ आता माजी महापौर यांच्यासह अनेक दिग्गज नेते कॉंगे्रसच्या संपर्कात आहेत. यामुळे आगामी काळात कॉंगे्रस महापालिका निवडणुक सर्व ताकतीने लढविणार आहे. आमच सर्व समविचारी पक्षांसोबत बोलणी सुरू असून जर चर्चा फिसकटली तर आमच्याकडे 20 प्रभागातील 81 जागांसाठी प्रभावी आणि सक्षम उमेदवार असल्याची माहिती खा.प्रा.रविंद्र चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, माजी आमदार हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, ओबीसी प्रदेशाध्यक्ष प्रा.यशपाल भिंगे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती डॉ.दिनेश निखाते, डॉ.करुणा जमदाडे, शाम दरक, बालाजी चव्हाण, डॉ.रेखाताई चव्हाण यांच्यासह आदींची यावेळी उपस्थिती होती.
काँग्रेसकडे 81 उमेदवारांची यादी तयार आहे-खा.चव्हाण
