सप्तरंगी साहित्य मंडळाची १०२ वी काव्यपौर्णिमा रंगली; कवी कवयित्रींनी दिला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
नांदेड- मानवी छळ प्रवृत्ती म्हणजे शारीरिक, मानसिक, लैंगिक किंवा आर्थिक स्वरूपाचा अत्याचार करण्याची प्रवृत्ती होय. . जात, लिंग, धर्म किंवा वयाच्या आधारावर भेदभाव केला जातो. मानवी छळ हा विविध स्वरूपात होतो आणि त्याला कायद्याने व समाजाने विरोध करणे आवश्यक आहे, जेणेकरून पीडितांना न्याय मिळेल आणि भविष्यात असा छळ थांबेल. छळाला विरोध करण्यासाठी अनेक कायदेशीर आणि सामाजिक उपाय आहेत. परंतु जनजागृती करण्यासाठी शहर व परिसरातील कवी कवयित्रींनी मानवी छळ प्रवृत्तींच्या विरोधात कवितेचे शस्त्र उगारले. यासाठी घेण्यात आलेल्या काव्यपौर्णिमा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री ज्योती करवंदे परांजपे यांची तर अतिथी कवी म्हणून सदानंद सपकाळे, देविदास वाघमारे, सुनंदा भगत, सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, नागोराव डोंगरे,
काव्य पौर्णिमचे संकल्पक प्रज्ञाधर ढवळे, रणजित गोणारकर, साईनाथ रहाटकर, डी. एन. मोरे खैरकेकर, सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे, सल्लागार प्रल्हाद हिंगोले आदींची उपस्थिती होती.
सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने विविध पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचा सन्मान करणारा समारंभ शहरातील हाॅटेल विसावा पॅलेस येथे आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या सन्मानार्थ कथाकथन, गझल मुशायरा आणि काव्यपौर्णिमा-१०२ या खुल्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, म. फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पुष्पपूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यानंतर कथाकथन आणि गझल मुशायरा उत्साहात संपन्न झाले. कविसंमेलनात आपल्या कवितेच्या माध्यमातून मानवी छळ प्रवृत्तींच्या विरोधात आसूड ओढले आणि समाजाला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. एकापेक्षा एक सरस आणि सुरस कवितांनी रंगत आणली. सहभागी कवी कवयित्रींचा मंडळाच्या वतीने पुष्पहार, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. सूत्रसंचालन अनुरत्न वाघमारे यांनी तर आभार रुपाली वागरे वैद्य यांनी मानले.

यांनी घेतला सहभाग
समारंभाच्या चौथ्या सत्रात घेण्यात आलेल्या काव्यपौर्णिमा कार्यक्रमात श्रद्धा करंडे, नम्रता खिल्लारे, जालंधर दवणे, देविदास वाघमारे, पद्मिनीताई धुळे, गयाताई कोकरे, राम गायकवाड, अलका मुगटकर, व्यंकटेश कंडारकर, विक्रम जाधव, रुपाली वागरे वैद्य,ताजकृष्णा वाघमारे, गंगाधर हरणे, सुनंदा भगत, कान्हा खानसोळे, भाग्यश्री आसोरे, सदानंद सपकाळे, अंजली हिंगोले, निरंजन तपासकर, शिल्पा ओतुळे, एनसी भंडारे, डी. एन. मोरे खैरकेकर, गणपत माकणे, पांडुरंग दाभाडे, धम्मोदय वाघमारे, अर्चना भद्रे, अनुरत्न वाघमारे, ज्योती करवंदे परांजपे, प्रज्ञाधर ढवळे, जीवन मांजरमकर, माधव जाधव, प्रा. प्रल्हाद हिंगोले, दत्ताज कदम, नागोराव डोंगरे, रणजित गोणारकर यांनी सहभाग घेतला.
