नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक राजेश देशमुख यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असून पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
नांदेड जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक राजेश देशमुख हे सध्या जिल्हा विशेष शाखा पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड येथे कार्यरत होते. या अगोदर त्यांनी भोकर, पोलीस ठाणे भाग्यनगर, पोलीस ठाणे शिवाजीनगर आदी ठिकाणी काम केल्याची माहिती आहे. राजेश देशमुख यांचे मुळगाव शिबदरा ता.हदगाव हे आहे. आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.नेहमी जनतेच्या कामासाठी हसत मुखाने झटणारा व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असल्याची माहिती प्राप्त झाली. वास्तव न्युज लाईव्ह परिवार सुध्दा देशमुख कुटूंबियांच्या दु:खात सहभागी आहे.
सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक राजेश देशमुख यांचे निधन
