नांदेड (प्रतिनिधी)-आज साहेबजादे शहादात दिवसानिमित्त गुरुद्वारा बोर्ड तर्फे सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले.या रॅलीच्या माध्यमातून समाजात एकोपा, शांतता आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला.अमरजीत सिंघ कुंजीवाले यांच्या तर्फे उपक्रमादरम्यान गुरुद्वारा गेट. नं. 2 येथे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आवश्यक पॅडचे वाटप करण्यात आले.शिक्षणाला प्रोत्साहन देत, विद्यार्थ्यांच्या भविष्याला आधार देणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला. वीर बालकांच्या बलिदानाची आठवण जपत समाजहित व सद्भावना जपण्याचा संदेश या रॅलीतून देण्यात आला. उपस्थिती डॉ. सचिन संभाजी पाटील उमरेकर (नांदेड दक्षिण विधानसभा प्रमुख),शितल खंडील,राज यादव, मनप्रीत सिंघ कुंजीवाले, परमवीर सिंघ मल्होत्रा, कुलप्रकाश सिंघ लिखारी
सज्जन सिंघ सिद्धू ,हरजीत सिंघ चुग, नरेंद्र सिंघ लिखारी ,राजा सिंघ फौजी,देवींदर सिंघ गल्लीवाले ,दुलिंदर सिंघ संधू ,
सुरजीत सिंघ तबेलेवाले ,महेल सिंघ लांगरी, केर सिंघ नालेवाले, अजित सिंघ बुंगई,जसवंत सिंघ शाहू, बचितर सिंघ सुखमणी, मनप्रीत सिंघ कारागीर, बलजीत सिंघ शाह,जसबीर सिंघ धुपीया, हरप्रीत सिंघ हॉटेलवाले, सरबजीत सिंघ हॉटेलवाले, सुरजीत सिंघ कारपेंटर, हरप्रीत सिंघ पुजारी,अमरप्रीत सिंघ हंडी, व इतर मान्यवर उपस्थित होते.

