नांदेड (प्रतिनिधी)-स्वातंत्र्यपू
स्वातंत्र्यपूर्व काळात 26 डिसेंबर 1925 रोजी भारतीय कम्युनस्टि पक्षाची स्थापना करण्यात आली. रशिया फ्रेंच क्रांतीतून प्रेरणा घेवून भारतातील काही साम्यवादी विचारांच्या स्वातंत्र्य सैनिकांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. या घटनेला 26 डिसेंबर 2025 रोजी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. पक्षाच्या वतीने संपुर्ण देश आणि विविध राज्यात स्थापना दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्याला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत नांदेड विधानसभा मतदारसंघातून कॉ.व्ही.डी.देशपांडे निवडून आले होते. त्या पाठोपाठ हदगावमधून कॉ.विरेंद्र शिंदे, किनवटमधून कॉ.सुभाष जाधव विधानसभेत निवडून आले होते. शहरातील जुन्या उस्मानशाही मिल मध्ये निजामकाळात अनेक मुस्लिम कामगारांसह इतर समाजाचे कामगार काम करत होते. हैद्राबाद मुक्ती संग्रामाचा लढा निझामाच्या जुलमी राज्यवटी विरुद्ध लढल्या गेलेल्या लढ्यात कॉ.व्ही.डी.देशपांडे, कॉ.सी.डी.चौधरी, कॉ.करुणाभाभी चौधरी, कॉ.अनंतराव नागापूरकर, कॉ.गोपाळराव कुर्तडीकर, कॉ.अब्दुल मजीद, कॉ. मुसा आदींनी कामगार चळवळीचे नेतृत्व करीत जातीय सलोखा राखला होता. राज्यकर्ता मुस्लिम असला तरी त्याच्या विरुध्द लढणारे असंख्य मुस्लिम कामगार कम्युनिस्टांच्या नेतृत्वाच्या लढ्यात सहभागी झाले होते. या इतिहासाचे स्मरण करीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नांदेड शाखेने आज पक्ष कार्यालयात ज्येष्ठ कम्युनिस्टांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे.
शतकपूर्ती निमित्त शुक्रवारी ज्येष्ठ कम्युनिस्टांचा सत्कार; भारतीय कम्युनिस्ट पक्ष स्थापनेला 100 वर्ष पूर्ण
या कार्यक्रमाला भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक संलग्न विविध क्षेत्रातील जनसंघटनांच्या नेते व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कॉ.शिवाजी फुलवळे, राज्य कौन्सील सदस्य ऍड. कॉ.प्रदीप नागापूरकर, कॉ.देवराव नारे, कॉ.वैशाली धुळे, कॉ.गणेश संदुपटला, कॉ.भगवान नाईक, कॉ.पद्मा तुम्मा, कॉ.गुरुपुठ्ठा, कॉ.श्रीराम यादगीरी, कॉ.शांताबाई पवळे, कॉ.वंदना वाघमारे, कॉ. उमाकांत कुंभार, आदींनी केले आहे
