नांदेड(प्रतिनिधी)-एका सेवानिवृत्त व्यक्तीला विश्र्वासात घेवून त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर आलेल्या रक्कमेचे 29 लाख रुपये घेवून त्यांची फसवणूक करणाऱ्या पती-पत्नीविरुध्द विमानतळ पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कांताबाई वसंतराव (बाबुराव) दाहने या सेवानिवृत्त महिला नाईकनगरमध्ये राहतात. नमस्कार चौक येथे राहणारे दिगंबर परळे आणि अनिता परळे या पती-पत्नीची त्यांची ओळख होती. सेवानिवृत्तीनंतर कांताबाई दाहणे यांना आलेले 29 लाख रुपये त्यांना विश्र्वासात घेवून त्यांनी घेतले आणि परत दिलेच नाही. या प्रकरणी कांताबाई दहाणे यांच्या तक्रारीवरुन विमानतळ पोलीसांनी गुन्हा क्रमांक 501/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस अंमलदार टाकळीकर या करीत आहेत.
सेवानिवृत्त व्यक्तीचे 29 लाख रुपये घेवून फसवणूक
