नांदेड -वर्षांनुवर्षे कायम रोजंदारीवर काम करणार्या व न्यायालयाचा कामावरुन कमी न करण्याचा आदेश असलेल्या कामगारांना तात्काळ काम उपलब्ध करुन द्यावे या मागणीसाठी शासकीय औद्योगीक कामगार संघटनेच्यावतीने दि.16 डिसेंबर पासून सामाजिक वनीकरण कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सामाजिक वनीकरण विभागातील नायगाव, देगलूर, बिलोली, मुखेड, धर्माबाद व हदगाव आदी विभागात 92-93 पासून कायम रोजंदारी कामगार म्हणून काम करणार्या कामगारांना तात्काळ रोजगार उपलब्ध करुन देण्यात यावा या मागणीसाठी संघटनेकडून वारंवार पत्रव्यवहार, आंदोलन करण्यात आले. परंतु प्रशासनाने काम उपलब्ध करुन न दिल्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कामगारांना तात्काळ कामावर रुजू करुन घ्यावे या मागणीसाठी दि.16 डिसेंबर पासून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शासकीय औद्योगीक कामगार संघटनेच्यावतीने सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर कामगार नेते ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर, कॉ.शिवाजी फुलवळे, कॉ.अब्दुल गफार आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
वनकामगारांचे 16 डिसेंबर पासून आंदोलन
