नांदेड (प्रतिनिधी) -डॉ. आंबेडकर नगरमध्ये सामाजिक कार्यकर्ते मनीष कांबळे यांच्या जन्मदिनी एजे ग्रुपने वेगवेगळ्या शाळांमध्ये शालेय साहित्य वाटप करून आपल्या बंधूंचा जन्मदिवस साजरा केला. डॉ.आंबेडकर नगर मधील बुद्ध विहारांमध्येही अनेक महिलांना सध्या हिवाळ्यातील वाऱ्यापासून वाचवण्यासाठी स्वेटर देण्यात आले. काल, ८ डिसेंबर रोजी डॉ.आंबेडकर नगरमधील सामाजिक कार्यकर्ते मनीष कांबळे यांचा जन्मदिन होता. AJ ग्रुपने त्यांचा वाढदिवस फक्त स्वतः आनंद व्यक्त करून साजरा केला नाही, तर विविध शाळांमध्ये जाऊन बालकांना शिक्षणासाठी लागणाऱ्या वह्या आणि पेन भेट दिले. सोबतच डॉ. आंबेडकर नगरमधील विहारांमध्ये येणाऱ्या वरिष्ठ महिलांना त्यांनी स्वेटरचे वाटप केले.
लोक म्हणतात आपल्या जीवनाबद्दल हिंदीमध्ये एक वाक्य आहे :
”जिदंगी “बेहतर” तब होती है
जब आप खुश होते है
लेकिन जिंदगी “बेहतरीन”तब होती है
जब आपकी वजह से
लोग खुश होते है..!! ”

या उक्तीप्रमाणे एजे ग्रुपने आपल्या बंधूंचा वाढदिवस साजरा करून समाजात एक संकेत दिला की वाढदिवस हा फक्त आपल्यासाठी किंवा आपल्या जवळच्या लोकांसाठी नसतो; त्यात इतरांनाही सामावून घेतले तर त्या वाढदिवसाच्या आनंदाची व्याप्ती खूप मोठी होते.वास्तव न्यूज लाईव्हच्या वतीने मनीष कांबळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

