
आता पुन्हा एकदा कुजबुज:
“शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येणार? मग एकनाथ शिंदेचा प्रश्नचिन्ह?”
ही चर्चा तर खूप दिवसांपासून उगाचच तोंड देत बसली होती, पण मोदींच्या भेटीनंतर तिला पुन्हा ‘ऑक्सिजन’ मिळाला. खरं सांगायचं तर हा लग्नसोहळा मोदींसाठी अजिबात नातलगाचा प्रकार नव्हता. पण ते गेले आणि तिथे राज ठाकरे यांची भेट झाली, आणि महाराष्ट्रात नव्या राजकीय लग्नाच्या चर्चेला सुरुवात झाली.

या सोहळ्यात भारताचे रक्षा मंत्री राजनाथ सिंह सुद्धा उपस्थित होत त्यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे जवळचे मानले जाते. शिवाय, राज ठाकरे आणि अमित शाह यांचे ‘रास जुळत नाही’ हे सगळ्यांनाच ठाऊक. त्यामुळे राजनाथ सिंह तिथे दिसले म्हणजे चर्चेला तेल मिळालेच “म्हणजे आता मोदी + राज, आणि एकनाथ शिंदे आऊट?” असा प्रश्न फुलला.
सगळ्यात भारी चर्चा ही की —
जर शिवसेनेची धनुष्यबाणची निशाणी आणि संपूर्ण पक्षच उद्धव ठाकरे यांना परत दिला, तर जुनी शिवसेना + भाजपची जोडी पुन्हा तयार होऊ शकते.
मग अर्थातच, शिंदे साहेबांची रवानगी ‘फास्ट ट्रॅक’वर लागू शकते.
सुप्रीम कोर्टाचा थांबलेला निर्णयही लवकरच येईल अशी हवा.कोणी कोणाला भिडवतोय, कोणाला जोडतोय महाराष्ट्रात हे राजकारण चालूच आहे. पण भाजपचा विचार मात्र नेहमीसारखाच ‘दूरदृष्टीचा’.शिवाय महाराष्ट्रात भाजपला मतदान मिळत नाही, हे त्यांनाही माहीत आहे.म्हणूनच, शिंदे यांना ‘वेगळे’ काढून, उद्धव यांच्याशी पुन्हा विवाहबंधन? ही चर्चा आता जोर धरत आहे.मोदींसाठी तो दिवस भलताच व्यस्त होता. पुतिन रात्रीचे जेवण करून विमानतळावरून रवाना झाले, आणि मोदी ताबडतोब दक्षिण दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्नाला उपस्थित.
लोकसभेत आकडेमोड अशी —
उद्धव ठाकरे : 7 खासदार
एकनाथ शिंदे : 9 खासदार
एकूण : 16
म्हणूनच हा ‘संख्या वाढवण्याचा’ लग्नसोहळा असल्याची चर्चा!
राज्यातही ‘घरवापसी’ कार्यक्रमाची कुजबुज सुरू.शिंदे वेगळे झाले, तर त्यांचे खासदार परत उद्धव ठाकरेंकडे जाणार हा अंदाजही जोरात. फक्त शिंदे यांचा मुलगा (जो खासदार आहे) तोच थोडा थांबेल, बाकी सगळे ‘उडणार’—असा दावा.
दैनिक देशोन्नतीचे संस्थापक प्रकाश पोहरे म्हणाले की, हा लग्नसोहळा “नियोजितपणे” मोदींच्या घराच्या जवळच्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आला.
त्यांच्या मते, एकनाथ शिंदे यांनी “स्वार्थ पाहून” भाजपला साथ दिली आणि भाजपने त्यांचा पुरेपूर उपयोग केला.शिवसेना फोडण्यात उद्धव ठाकरे स्वतःही थोडे ‘झोपेत’ होते. कारण दोन वर्षे कोरोना काळात ते मंत्रालयात गेलेच नाहीत, म्हणजे तिथे काय चाललंय हे त्यांना समजलं नाही,असा कटाक्ष.प्रकाश पोहरे म्हणतात, भाजपला सत्तेसाठी शिंदेची गरज नाही. काळ गेल्यावर ते अजित पवार यांनाही बाहेर काढतील हेच राजकारणाचे सत्य.
या संभाषणात उमाकांत लखेडा म्हणाले की, लवकरच मुंबई महापालिकेची निवडणूक आहे.सध्या उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नाते ‘थंड’ झाले आहे, म्हणजे उद्धव ठाकरे कदाचित निवडणूक एकटे लढवतील.म्हणूनच पुन्हा ‘गठबंधन’ चर्चेची हवा. अजून एक रोचक गोष्ट शिंदे यांच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की, शिंदे सध्या खूपच परेशान आहेत. त्यांच्यामागे उभं राहण्यासाठी लोक प्रयत्न करत आहेत, पण ते स्वतःच केंद्रित नाहीत.याचा सरळ अर्थ —शिंदे सरकारमधून बाहेर जाण्याची वेळ फार दूर नाही!
