नांदेड(प्रतिनिधी)-बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर यांनी मांजरा नदीपात्रात छापा टाकून 12 जुगाऱ्यांना पकडले आहे. त्यांच्याकडून 87 हजार रोख रक्कमेसह 2 लाख 34 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा छापा बिलोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत नायगाव आणि रामतिर्थ पोलीसांनी केलेला आहे.
नायगाव येथील पोलीस उपनिरिक्षक गजानन व्यंकटराव तोटेवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 डिसेंबर रोजी मध्यरात्रीनंतर 3 वाजेच्यासुमारास बिलोलीचे पोलीस उपअधिक्षक शाम पानेगावकर यांच्या मार्गदर्शनात त्यांच्यासोबत पोलीस अंमलदार रामचंद्र काळे, शंकर पवार, ज्ञानेश्र्वर पुणेबोईनवाड, बालाजी शिंदे, राजू मुसळे, विनोद भंडारे, अशोक यडपलवार, प्रकाश बेळीकर, संजय शिंदे यांनी मांजरा नदीपात्रातील राजू पाटील यांच्या शेताच्या पुर्वस छापा टाकला. तेथे एका टेन्टमध्ये जुगार सुरू होता.
पोलीसांनी त्या ठिकाणावरून रमेश सायलु जुटू, राजेश बुध्देवार, संदीप नागेंद्र मलेपुला, गंगाधराम वर्णी, राजेश्वर गुमगोैंडा गोरला, संतोष रामलू मलेपुला, गोरजी वडेप्पा मुसके सर्व रा.सालूरा ता.बोधन जि.निजामाबाद, नागनाथ धोंडीबा जामलू, सदाम पिंजारी रा.कार्ला ता.बिलोली, रमेश राजाराम मलशेटवाड, संतोष दत्ताराव सोनपुरे रा.सगरोळी ता.बिलोली यांच्याविरुध्द बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 298/2025 दाखल करण्यात आला आहे.
या जुगाऱ्यांची पण काय कमाल ना नदीपात्रात जुगार खेळत आहेत. या जुगऱ्यांकडून रोख रक्कम 87 हजार, 10 मोबाईल, 1 दुचाकी गाडी असा एकूण 2 लाख 34 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नदीपात्रात जुगाराचा अड्डा; पोलीसांनी उध्वस्त केला
