नांदेड(प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात 23 विद्यापिठाचे 5 हजार खेळाडू सहभागी झाले आहेत. आज सकाळी तेथे न्याहारी या प्रकारात आळ्या निघाल्याचे व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. आपल्या विद्यापीठाचे नाव खराब होवू नये म्हणून जेवणाच्या गुणवत्तेवर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी सुध्दा नियंत्रण ठेवायला हवे. नाही तर हे 23 विद्यापीठाचे 5 हजार खेळाडू काय प्रतिक्रिया देतील.
मागील आठवड्यापासून नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या मैदानावर महाराष्ट्र अंतर विद्यापीठ स्पर्धा होत आहेत. या स्पर्धांमध्ये अनेक खेळांचा समावेश आहे. या स्पर्धेमध्ये 23 विद्यापीठांचे जवळपास 5 हजार खेळाडू आले आहेत. या एवढ्या मोठ्या समारंभाच्या जेवणाची सोय विद्यापीठातील एका भोजन कक्षात करण्यात आली आहे. या भोजन कक्षावर परभणी येथील जैन भोजनालय व केटर्स या नावाचे बॅनर लावलेले आहेत. प्राप्त झालेला व्हिडीओ ज्या ठिकाणचा आहे. त्या ठिकाणी पंच, व्यवस्थापक व मार्गदर्शक यांची भोजन व्यवस्था आहे. खेळाडूंची भोजन व्यवस्था या भागात नाही. परंतू जो व्हिडीओ प्राप्त झाला त्यामध्ये पोहे खालेले दिसतात, थोडी अर्धवट ईटली आहे आणि थोडा उपमा पण आहे. या प्लेटमध्ये आळ्या स्पष्टपणे दिसतात.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे नाव आणि येथील व्यवस्था खराब आहे असे यामुळे लोकांना बोलण्याची संधी प्राप्त झाली आहे. ज्यानी कोणी हा व्हिडीओ घेतला असेल आणि व्हायरल केला असेल तो तेथे नाष्टा करण्यासाठीच आला असेल. आपल्या घरातल्या एखाद्या प्लेटमध्ये असे घडले तर आपण त्याचा व्हिडीओ व्हायरल करत नाही. पण विद्यापीठाच्या या जेवणाच्या परिस्थितीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. म्हणून कुटूंबप्रमुख म्हणून या प्रकराकडे गांभीर्याने पाहण्याची जबाबदारी सुध्दा कुलगुरू डॉ.मनोहर चासकर यांचीच आहे.
संबंधीत व्हिडीओ….
व्हिडिओ –१
व्हिडिओ–२
