अर्धापूर : पिंपळगाव पाटीजवळ अवैध वाळूच्या 4 गाड्या जप्त; मुद्देमालाचा आकडा  1 कोटीहून अधिक 

अर्धापूर (प्रतिनिधी)- अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळगाव पाटीजवळील विश्वप्रयाग हॉटेलच्या मागे अवैध वाळूने भरलेल्या गाड्या उभ्या असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने तात्काळ धाड टाकून चार वाहने जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या तीन हायवा आणि एका टिप्परची एकूण किंमत ₹1,01,70,000 एवढी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळी पहाटे कारवाई

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या फिर्यादीनुसार, 6 डिसेंबर रोजी सकाळी 5 वाजता (माहिती 5 डिसेंबरच्या रात्री 10.30 वाजता मिळाली होती) ते सहाय्यक पोलीस निरीक्षक चित्तरंजन ढेमकेवाड, पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे, पोलीस कॉन्स्टेबल विजय कदम आणि भीमराव राठोड यांच्यासह गस्त घालत होते. त्यादरम्यान त्यांना पिंपळगाव पाटील परिसरात अवैध वाळूने भरलेल्या गाड्या लपवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी त्या ठिकाणी पोहोचून तपासणी केली असता खालील वाहने आढळून आली—

  • हायवा MH-26-CH- 0029
  • हायवा MH-26-CH-2877
  • हायवा MH-21-BH-2635
  • टिप्पर MH-48-J-0085

सर्व वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाळू भरलेली असल्याची नोंद घेण्यात आली.

चालक पसार, मालक–चालकांवर गुन्हा दाखल

कारवाईदरम्यान चालक गर्दीचा फायदा घेऊन पळून गेले. त्यानंतर संबंधित हायवा आणि टिप्परच्या मालक व चालकांविरुद्ध पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या तक्रारीवरून  गुन्हा क्र. 698/2025 दाखल करण्यात आला आहे. यामध्ये हायवा मालक–चालक तसेच टिप्पर मालक–चालक असे चारही व्यक्ती आरोपी म्हणून नमूद आहेत.

अर्धापूर पोलिसांचे कौतुक

या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस उपअधीक्षक डॅनियल बेन यांनी अर्धापूर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले असून अवैध वाळूउद्योगाविरोधात अशीच कठोर मोहीम सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!