सक्षम ताटे हत्याकांडात आरोपी संख्या नऊवर; आदित्य सोनमनकर  10 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत  

नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील गाजलेल्या सक्षम ताटे खून प्रकरणात आणखी एका आरोपीची अटक करण्यात आली असून, या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या आता नऊ झाली आहे. अटक झालेल्यांमध्ये एक आरोपी हा विधीसंघर्षग्रस्त अल्पवयीन असून त्याबाबतचे प्रकरण बाल न्याय मंडळात प्रलंबित आहे.

27 नोव्हेंबर रोजी मिलिंद नगर भागात सक्षम गौतम ताटे (25) याची गोळ्या घालून आणि फरशीने डोके फोडून  निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सक्षमचा मृत्यू झाला असून तपासादरम्यान त्याची प्रेमिका आंचलची आई जयश्री गजानन मामीलवाड (41), वडील गजानन बालाजी मामीलवाड (44), तसेच साहिल उर्फ सन्नी मदनसिंह ठाकुर उर्फ साहिल गजानन मामीलवाड (27), सोमेश सुभाष लखे, वेदांश अशोक कुंदेकर उर्फ कुलदेवकर, अमन देविदास शिरसे, आणि एक अल्पवयीन बालक अशा व्यक्तींना अटक करण्यात आली होती.या आरोपींपैकी काही जण पोलीस कोठडीत असताना,  गजानन बालाजी मामीलवाड (44), तसेच साहिल उर्फ सन्नी मदनसिंह ठाकुर उर्फ साहिल गजानन मामीलवाड (27)सोमेश सुभाष लखेवेदांश अशोक कुंदेकर उर्फ कुलदेवकर (18.7), यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी न्यायालयीन (तुरुंग) कोठडी सुनावली आहे.

आठवा आरोपी आदित्य  सोनमनकर  अटक

पोलिसांनी काल दिनांक 5 डिसेंबर रोजी आदित्य रामदास सोनमनकर (19), रा. सिद्धनाथ पुरी चौफाळा  याला अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर केले असता अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एम. शिंदे यांनी त्याला 10 डिसेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी दिली.

इतर आरोपींच्या कोठड्या

  • अमन देविदास शिरसे9 डिसेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी
  • यापूर्वी अटक असलेल्यांपैकी चार जणांना न्यायालयीन कोठडी, तर उर्वरित दोन जणांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

अल्पवयीन आरोपीला ‘वयस्क श्रेणीत’ घालण्याची मागणी

 

प्रकरणातील एक आरोपी विधीसंघर्षग्रस्त अल्पवयीन आहे. परंतु या अल्पवयीनावर यापूर्वीही विविध गुन्ह्यांची नोंद असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिस उपअधीक्षक प्रशांत शिंदे यांनी बाल न्याय मंडळाकडे अर्ज दाखल करून त्या आरोपीची गणना वयस्कर श्रेणीत करण्याची मागणी केली आहे.आज न्यायालयात सरकारी वकील ऍड. एम. ए.बत्तुला (डांगे) यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. 

संबंधित बातमी …. 

सक्षमच्या खून प्रकरणात चार आरोपींची पोलीस कोठडी दुसऱ्यांदा वाढली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!