मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रियेची पाहणी करुन अधिकाऱ्यांशी साधला संवाद
नांदेड – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज दिवसभर लोहा, कंधार, भोकर, उमरी आणि मुदखेड तालुक्यातील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन मतदान प्रक्रियेच्या प्रगतीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार व इतर अधिकारी यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधा, सुरक्षा व्यवस्था, दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांसाठी उपलब्ध केलेल्या सुविधा, तसेच मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडत आहे की नाही याची तपासणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून आवश्यक त्या सूचना दिल्या. आज जिल्ह्यातील 10 नगरपरिषदा व एका नगरपंचायतीचे मतदान शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
