छत्रपती संभाजीनगर – राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्याबाबत राज्य शासनाने गठीत केलेल्या डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समिती लोकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी बुधवार दि.२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे येत आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पूर्वतयारीचा आढावा घेतला. शिक्षण उपसंचालक कैलास दातखीळ, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी (योजना) अरुण शिंदे, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे, डॉ. विशाल तायडे, विवेकानंद महाविद्यालयाचे प्रा. केशरचंद राठोड, पवनकुमार गोरे, देवगिरी महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. समिता जाधव, डॉ. एम.एफ. मेवाड, पोलीस निरीक्षक शिवाजी तावरे आदी उपस्थित होते.
बैठकीत माहिती देण्यात आली की. त्रिभाषा धोरण निश्चिती समिती दि.२५ रोजी रात्री जिल्ह्यात येणार असून बुधवार दि.२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून एमआयटी महाविद्यालयाच्या आनंद सभागृहात समिती विविध घटकांना भेटणार आहे. त्यात भाषा तज्ज्ञ, साहित्यिक, शिक्षण तज्ज्ञ, बालमानस तज्ज्ञ, शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण संस्था चालक, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, प्रसार माध्यम प्रतिनिधी, शिक्षक- पालक संघ आदी उपस्थित राहतील. त्यांचे म्हणणे समिती जाणून घेईल.
समितीचे स्वरुपः-अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव, सदस्य- डॉ. सदानंद मोर्रे, डॉ. वामन केंद्रे, डॉ. अप्रणा मॉरिस, डॉ. सोनल कुलकर्णी, डॉ. मधुश्री सावजी, डॉ. भूषण शुक्ल, सदस्य सचिव संजय यादव राज्य प्रकल्प संचालक समग्र शिक्षा अभियान.
