नांदेड –जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने जिल्हा मध्यवर्ती बसस्थानक नांदेड येथे तंबाखू मुक्त युवा अभियान 3.0 अंतर्गत जनजागृती कार्यक्रम 18 नोव्हेंबर 2025 रोजी संपन्न झाला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पांडुरंग पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली व नोडल अधिकारी डॉ. हनुमंत पाटील यांच्या नियंत्रणाखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रणातर्गंत या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तरुणांमध्ये तंबाखूचे व्यसन वाढत आहे. ही एक गंभीर आरोग्य समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने 9 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2025 या कालावधीत संपूर्ण देशामध्ये तंबाखू मुक्त युवा अभियान 3.0 राबविले आहे. त्याअनुषंगाने जिल्हा मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांना तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती देणारी पोस्टर्स, पोम्लेटचे वाटप करून जनजागृती करण्यात आली. हा कार्यक्रम बस स्थानक प्रमुख यासीन खान यांच्या उपस्थित घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी जिल्हा सल्लागार डॉ. शितल चातुरे, डॉ. संजीवनी जाधव, समुपदेशक प्रकाश आहेर व सामाजिक कार्यकर्ते बालाजी गायकवाड तसेच जिल्हा मध्यवर्ती बसस्थानक येथील लिपिक सुरेश फुलारी, गुलाब रब्बानी व इतर कर्मचारी उपस्थित होते. Kanthak Suryatal Post Views: 479 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation बिहार निकालात ‘एक लाख’चा भुताटकी पॅटर्न — लोकशाहीचा डेटा की डिझाइन? अण्णासाहेब पाटील महामंडळाचे काम सुरळीत; नवीन LOI देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार