नांदेड(प्रतिनिधी)-उस्माननगर पोलीसांनी कौठा फाटा जवळ, धनज रस्त्यावर एक टिपर पकडला. ज्यामध्ये अवैध वाळू भरलेली होती. वाळूची किंमत 15 हजार आणि टिपरची किंमत 15 लाख असा 15 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
उस्माननगरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार गंगाधर चिंचोरे, माधव पवार, तुकाराम जुन्ने, प्रकाश पेद्देवाड हे दि.9 नोव्हेंबर रोजी दुपारी गस्त करत असतांना त्यांना मिळालेल्या माहितीनुसार ते मौजे कौठा फाटा येथे पोहचले. येथे टिपर क्रमांक एम.एच.26 ए.डी.8411 होता. त्यामध्ये तीन ब्रास वाळू भरलेली होती. उस्माननगर पोलीसांनी पोलीस अंमलदार माधव पवार यांच्या तक्रारीवरुन या गाडीचा फक्त चालक मुरलीधर प्रकाश ढगे (28) रा.येळी ता.लोहा याच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 268/2025 दाखल केला आहे.
उस्माननगर पोलीसांनी अवैध वाळू पकडली
