नांदेड, (प्रतिनिधी) आर.पी.आय.(आठवले)पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आपली निष्ठा, संघटनशक्ती आणि समर्पण सिद्ध करण्याची वेळ आली आहे. विजयदादा सोनवणे यांनी केलेले आवाहन ही केवळ कार्यकर्त्यांना दिलेली सूचना नाही, तर ती पक्षाच्या भविष्यासाठी दिशा दाखवणारी हाक आहे आणि या हाकेला ओ देवुन येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीतील उमेदवारास निवडुन आना असे आवाहन सोनवणे यांनी केले आगामी होवु घातलेल्या नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तर्फे पुर्वतयारी बैठकीचे आयोजन दि. ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १ (एक)वाजता रिपाई ( आठवले ) कार्यालय, आंबेडकर नगर नांदेड येथे बैठक घेण्यात आली या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) चे महाराष्ट्र राज्य संघटक विजयदादा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली तर प्रमुख अतिथी मराठवाडा उपाध्यक्ष सुखदेव चिखलीकर, उत्तर जिल्हाध्यक्ष मिलिंद शिराढोणकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष गौतम काळे ,सौ . निशा सोनवणे म. आ.जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली .यावेळी भोकर तालुका अध्यक्ष जयभीम पाटील ,मनोज शिंदे , रमेश वाघमारे,प्रशांत कांबळे, गोवर्धन पवार , मिलिंद जोंधळे उपस्थित आदि होते .श्री सोनवणे म्हणाले कि आठवले साहेबांच्या आदेशानुसार प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या विभागात संघटन वाढवणे, पक्षाचे विचार जनतेपर्यंत पोहोचवणे आणि आगामी होवु घातलेल्या निवडणुकीत आर पी आय ( आठवले ) पक्षाचे उमेदवार विजयी करण्या साठी झटणे हीच खरी राजकीय निष्ठा जनतेचा विश्वास मिळवण्यासाठी केवळ भाषणे नव्हे, तर कृतीतून निष्ठा दाखवणे आवश्यक आहे.आजच्या राजकीय वातावरणात पक्षांतील एकजूट आणि विचारांवरील श्रद्धा यांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. कार्यकर्त्यांनी एकत्र राहून,पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच भारत सरकारचे सामाजिक न्याय राज्य मंत्री मा.ना.रामदासजी आठवले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केले तर कोणतीही लढाई अवघड नाही. विजयाचा मार्ग निष्ठा आणि संघटनेतूनच तयार होतो, हे या आवाहनातून स्पष्टपणे जाणवते राजकारणात व्यक्तीपेक्षा विचार आणि कार्यसंघ महत्त्वाचा असतो. कार्यकर्त्यांनी हे तत्व मनात ठेवून पुढील वाटचाल केली, तर आर.पी.आय ( आठवले ) पक्ष नक्कीच अधिक सक्षम आणि जनतेच्या विश्वासास पात्र ठरेल, साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, शिस्त, निष्ठा आणि कार्यतत्परतेने काम करणे हेच आजचे खरे राष्ट्रकार्य आहे .या वेळी सदर बैठकीस जिल्हा कमिटी, तालुका कमिटी,महीला आघाडी ;युवक आघाडी तसेच संलग्न असलेल्या सर्व आघाड्या, जिल्हा, तालुका, वार्ड पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थित होते जिल्ह्यातील सर्व रिपाई कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
