सत्ताधाऱ्यांना जागे करण्यासाठी प्रथम तारुचा “रॅप’ प्रभावी

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या जीवनात येणाऱ्या त्रासांना व्यक्त करण्यासाठी आणि तो त्रास राज्यकर्त्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आज तंत्रज्ञान युगाच्या काळात अनेक नवीन साधणे तयार झाली.त्यातच नांदेडचा युवक प्रथम युवराज तारुने रॅपच्या माध्यमातून नांदेडच नव्हे तर राज्यात झालेली अतिवृष्टी आणि महापुराच्या पार्श्र्वभूमीवर रॅपच्या माध्यमातून आणि निखळ ग्रामीण मराठी भाषेत रॅपच्या माध्यमातून राज्यकर्त्यांना ओला दुष्काळ जाहीर करण्याची केलेली मागणी आमच्या लेखणीने दखल घ्यावी अशीच आहे.
भारत स्वातंत्र्य झाला तेंव्हा फक्त वर्तनमानपत्रेच जनतेचे दु:ख राज्यकर्त्यांसमोर मांडत होती. त्यानंतर टेलिव्हीजन आले. आज तर अनेक वृत्तवाहिन्या तयार झाल्या. पण त्या कुठे तरी शासनाच्या गळाला लागलेल्या दिसतात. म्हणून समाजााने, जनतेने, युवकांनी आणि त्रासलेल्या नागरीकांनी व्हाटसऍप, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, एक्स या माध्यमातून आपल्या त्रासाला व्यक्त करण्यासाठी एक नवीन मार्ग शोधला. हा मार्ग पण प्रशंसनियच आहे.
नांदेडचा युवक प्रथम युवराज तारुने तयार केलेले अतिवृष्टी आणि पुरावरील रॅप अत्यंत श्रवणीय आहे. राज्यकर्त्यांपर्यंत हा रॅप पोहचला असेल तर नक्कीच त्यावर राज्यकर्त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. या रॅपमध्ये तारु सांगतो नेत्यांच्या खिशात करोडो रुपये आहेत. मराठवाडा बुडाला तरी मंत्र्यांना वेळ नाही. नांदेडच नव्हे तर अख्या मराठवाड्यात पावसाने कहर केला पण प्रशासनाला जाग आली नाही. एकीकडे पुराचा कहर आणि दुसरीकडे भ्रष्टाचार या साखळीमध्ये सरकारचे वचन कागदावरच राहिले. घरात पाणी आले नाही तर पाण्यात आमचे घर आल. जनावरे वाहुन गेली.जगायला त्रास झाला. आमचे घर पाण्यात गेले याची आठवणच राहिली. लाचखोरीच्या बाजारात पैशांचा खेळ सुरू आहे आणि सामान्य जनतेच्या हातात केळ आहे. जनतेने हे लक्षात ठेवायला पाहिजे की, आवाज उठविणे हा आमचा हक्क आहे. प्रथम तारुच्या रॅपप्रमाणे आज न उद्या हा आक्रोश उसळेल. रस्त्यावर उतरुन न्याय हक्कासाठी लढले जाईल. भ्रष्ट चोरांचा बुरखा जनता लवकरच फाडेल. शेतकरी संकटात असतांना विमानात मात्र आमदार, खासदार, मुख्यमंत्री फिरतात. गोर गरीबांचे स्वप्न आरशा सारखे तुटून शंभर तुकडे झाले आहेत पण मंत्र्यांचा विदेश टुर चालू आहे. अनेक शेतकऱ्यांनी फाशी घेतली आहे. प्रशासनिक अधिकारी, नगरपालिका आयुक्त सगळेच भ्रष्टाचाराचा हिस्सा खातात म्हणूनच प्रथम तारुने सरकारला विनंती केली आहे की, आश्वासनाचे भिजत घोंगड ठेवण्यापेक्षा संकटाची वेळ आहे म्हणूनच ओला दुष्काळ जाहीर करा साहेब अशी आरव प्रथम तारुने आपल्या रॅपमधून व्यक्त केली आहे.
संबंधीत रॅपची लिंक…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!