नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीसांनी दहा लाखांचा ट्रक आणि 9 लाखांच्यज्ञा म्हशी असा मुद्देमाल पकडून गुजरात राज्यातील तीन आणि उत्तर प्रदेश राज्यातील एक अशा चार जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
भाग्यनगरचे पोलीस उपनिरिक्षक नरेश वाडेवाले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 31 ऑक्टोबर रोजी ते आपल्या परिसरात गस्त करीत असतांना मोर चौक काबरानगर परिसरात त्यांनी सी.जे. 02 झेडझेड 3004 क्रमांकाची ट्रक तपासणी केली. यामध्ये दाटीवाटीने, दोरीने बांधून, कोंबून प्राण्यांना कु्ररतेची वागून देत असल्याचे दिसले. त्यांच्याकडे कोणतेही वैध कागदपत्र किंवा वैद्यकीय कागपत्र नव्हते. एका ट्रकमध्ये 18 म्हशी दाटून भरलेल्या होत्या.
या प्रकरणी जावेद भाई महेबुब भाई शेख (22), रहेमतुला खान बिसमिल्ला खान (32), दिलसाद इकबाल अन्सारी (35) तिघे रा.गुजरात आणि शंभुनाथ उमाचरण यादव (45) रा.उत्तरप्रदेश या चौघांविरुध्द भारतीय प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा 1960 नुसार गुन्हा क्रमांक 580/2025 दाखल केला आहे.
पोलीस उपअधिक्षक रामेश्र्वर व्यंजने, पोलीस निरिक्षक संतोष तांबे यांनी या कार्यवाहीसाठी पोलीस उपनिरिक्षक नरेश वाडेवाले, विनोद देशमुख, पोलीस अंमलदार विशाल माळवे, गजानन किडे, निवृत्ती घुले, अदनान पठाण, विष्णुकांत मुंडे, नागनाथ चापके, देवसिंह सिंगल, राहुल लाठकर यांचे कौतुक केले आहे.
भाग्यनगर पोलीसांनी दहा लाखांचा ट्रक आणि नऊ लाखांच्या म्हशी पकडल्या
